गायीपासून एड्सची लस बनू शकते ! – अमेरिकेतील शास्त्रज्ञांचा दावा

0
611
Google search engine
Google search engine

न्यूयॉर्क – गायीपासून बनलेली लस एड्सवरील आतापर्यंतची सर्वांत परिणामकारक लस बनू शकेल, असा दावा अमेरिकेच्या शास्त्रज्ञांनी केला आहे. ‘नेचर’ या अमेरिकी जर्नलमध्ये ही माहिती नमूद करण्यात आली आहे.

या जर्नलने दिलेल्या माहितीनुसार, गाय हा प्राणी सर्वांत निरोगी प्राणी आहे. गायीची पचनसंस्था ही गुंतागुंतीची आणि जिवाणूयुक्त असते. त्यामुळे गायीच्या शरिरात रोगाचे जंतू शिरकाव करू शकत नाहीत.जर चुकून विषाणूंचा शिरकाव झालाच, तर गायीचे शरीर नेहमी एका विशिष्ट प्रकारचे प्रतिजैविक निर्माण करत असते, ज्यामुळे विषाणू टिकाव धरू शकत नाहीत.

एच्आयव्ही या एड्सविषाणूविषयी गायीच्या शरीरतंत्राचा वापर केल्यानंतर ४२ दिवसांमध्ये एड्सची क्षमता तब्बल २० टक्क्यांनी घटल्याचे समोर आले आहे. या हिशोबात साधारण ३८१ दिवसांत एड्सचे प्रमाण ९६ टक्के इतके न्यून होऊ शकते, असे प्रयोगाअंती शास्त्रज्ञांनी सिद्ध केले आहे. माणसाच्या शरीराची प्रतिजैविक निर्माण करण्याची क्षमता ३ ते ५ वर्षांची असते; पण गायीप्रमाणे हाच वेग जर वाढवता आला, तर भविष्यात एड्सवर पूर्णपणे नियंत्रण आणणे शक्य होणार आहे.