प्रधानमंत्र्यांकडून घाटकोपर इमारत दुर्घटनेतील मृतांच्या वारसांना, जखमींना मदत जाहीर

423

नवी दिल्ली : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज मुंबईतील घाटकोपर येथील इमारत दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियांना रूपये २ लाख तर जखमींना प्रत्येकी ५० हजार रूपयांची मदत जाहीर केली आहे.

घाटकोपर येथील दामोदर पार्क जवळील सिद्धी साई ही चार मजली इमारत २५ जुलै २०१७ रोजी कोसळून झालेल्या दुर्घटनेतील मृतकांच्या कुटुंबियांना व जखमींना प्रधानमंत्री कार्यालयाकडून मदत जाहीर करण्यात आल्याची माहिती प्रधानमंत्री कार्यालयाच्या अधिकृत ट्वीटर हँडलवर देण्यात आली आहे.

जाहिरात