*वाहतूक पोलिसांची रस्त्यावर अशीही परिस्थिती**वाहतूक नियमांचे उल्लंघन करणारे मोकाट. – रक्षक करतात आराम*

0
604
Google search engine
Google search engine

चांदूरबाजार/ श्री प्रमोद नैकेले/–


आजकाल रस्त्यावर व महामार्गावर अनेक अपघात होत आहेत ते थांबवण्याकरीता शासन एकीकडे विविध उपाययोजना करत असतांना दुसरीकडे शासनाने नेमलेले वाहतूक पोलीस रस्त्यावर अश्या पध्दतीने आपली सेवा देत आहेत.
चांदूर बाजार रिध्दपूर मार्गावर सोनोरी फाट्यावर शासकीय कर्तव्यावर असणारे वाहतूक पोलीस चक्क आपल्या दुचाकी वर विश्रांती घेत असल्याचे एका जागृत नागरी काला आढळले.त्यांचे समोरून दुचाकी वाहन धारक चौबल सीट घेऊन त्यांच्या नाकावर टीच्चून वाहतूक नियमांचे उल्लंघन करीत असतांना त्यांचेवर कारवाई न करता हे महाशय चक्क आपल्या दुचाकी वर आराम करीत आहेत तर त्याचे इतर सहकारी गप्पा मारत असल्याचे स्पष्ट दिसत आहे.एवढेच नव्हे तर हे कर्मचारी आपले कर्तव्य बजावत नाही असेही नाही तर त्यांच्या जाळ्यात मोठा मासा फसण्याची वाट बघत आहेत कारण थोड्याच वेळात येथून एक मोठे वाहन जात असतांना हेच कर्मचारी एका कर्तव्यदक्षता दाखवून त्या वाहनाचा सापडेपर्यंत पाठलाग करतात व आपल्या रिकाम्या खीश्याची पोकळी भरुन पुन्हा विसावा घेतात.यामागे असा उद्देश मुळीच नाही की दुचाकी स्वारास दंड करावा व मोठी वाहने सोडून द्यावी तर नियमांचे उल्लंघन करणा-या प्रत्येकाला नियमानुसार दंड व्हावा व ती दंडाची रक्कम शासकीय तीजोरीत जमा व्हावी जेणे करून नियम कुणी तोडणार नाही व शासकीय तीजोरीत महसुल जमा होऊन त्याचा विधायक कामात उपयोग होईल व शासनाचे अपघात कमी करण्याचे धोरण सुध्दा यशस्वी होईल.असे मत सचिन खलोकार,योगेश दुबे,विनोद कैकाडे,गोलूभाऊ शिंगणे,आशीष हावरे,शकील शहा,अंकुश घटाळे व राजेश खडसे या प्रत्यक्षदर्शी जागृत युवा नागरीकांनी व्यक्त केले.विशेष म्हणजे या गोष्टीची चिड असणा-या आमदारांच्या मतदार संघात व त्यांच्या गावात हा प्रकार घडत असल्याने हि फार गंभीर असल्याचे बोलल्या जात आहे.