बारावी विज्ञान शाखेत अंकित सरोसरे ला ८७.२३ टक्के गुण प्रशासकिय सेवेत जाऊन देशाची सेवा करणार

0
674
Google search engine
Google search engine



चांदूर रेल्वे / शहेजाद खान –

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या १२
वी च्या परीक्षेमध्ये चांदूर रेल्वे येथील अंकित मधुकर सरोसरे याने विज्ञान शाखेत ८७.२३
टक्के गुण प्राप्त केले असून पुढे एमपीएससी/युपीएससी स्पर्धा परीक्षेतून प्रशासकीय सेवेत
जाऊन देशाची सेवा करणार आहे.
अंकित हा सेफला विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय, धामणगाव रेल्वे चा विद्यार्थी आहे. अंकितने
गणितामध्ये १०० पैकी ९७ गुण मिळविले असुन त्याला पुण्याच्या फग्र्युसन कॉलेज मधून
बिएसस्सी मॅथ करून एमपीएससी/युपीएससी स्पर्धा परीक्षेतून प्रशासकीय सेवेत जायचे आहे.
दहावीच्या परीक्षेमध्ये अंकितने ९५.६० टक्के गुण मिळवून चांदूर रेल्वे तालुक्यातून अव्वल
स्थान पटकविले होते. अंकीतचे वडिल सुलभाताई जगताप विद्यालय,निमगव्हाण येथे शिक्षक
म्हणून कार्यरत असून आई गृहिणी आहे. या यशाबद्दल त्याचे मुख्याध्यापक महेंद्र कांबळे,
विवेक युनाते, संजय कोल्हे, संजय आरेकर, किशोर वाघ, श्री.पराते यांनी कौतुक केले.
यशाचे श्रेय त्याने आईवडिलासह प्राचार्य चांडक, प्रा.देशमुख, प्रा. टावरी, नरेश कावलकर
यांना दिले आहे.