*श्रीमती उषाबाई देशमुख कनिष्ठ विज्ञान महाविद्यालयाचा 99 टक्के निकाल*

0
918
Google search engine
Google search engine

  *यशाची उज्वल परंपरा कायम,व्यवस्थापक मंडळाने केले यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन*

अचलपूर / श्री प्रमोद नैकेले /-
हायस्कूल एज्युकेशन सोसायटी अचलपूर शहर द्वारा संचालित श्रीमती उषाबाई देशमुख कनिष्ठ महाविद्यालय तथा सिटी हायस्कूल चा वर्ग 12 वी चा निकाल 99.16 टक्के लागला यशस्वी विद्यार्थ्यांचे व्यवस्थापक मंडळाने अभिनंदन केले.
 स्थानीक सिटी हायस्कूल या नामवंत शाळेत विज्ञान व कला शाखेत कनिष्ठ महाविद्यालय चालवल्या जाते.नुकत्याच महाराष्ट्र राज्य परिक्षा मंडळाचा जाहीर झालेल्या वर्ग 12 वी चा निकाल घोषित करण्यात आला त्यामध्ये उषाबाई देशमुख कनिष्ठ महाविद्यालयाचा विज्ञान शाखेचा 99.16 तर कला शाखेचा 98 टक्के निकाल लागून यशाची उज्वल परंपरा कायम ठेवली.या उत्कृष्ठ निकाला बद्दल संस्थेच्या अध्यक्षा माधूरीताई देशमुख,उपाध्यक्ष अनिलकाका देशमुख,सचिव अँड.दीपक देशमुख,जेष्ठ सदस्य हरदासजी,नंदाकाकू देशमुख यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे व शिक्षक वर्गाचे अभिनंदन केले.महाविद्यालयाचे प्राचार्य सुनिल अंजनकर,उपप्राचार्य पांडे व पर्यवेक्षक राजेश कोमेरवार यांनी सांगितले विज्ञान शाखेत 120 पैकी 119 उतीर्ण झाले त्यामध्ये प्रावीण्य श्रेणीत 49, प्रथम श्रेणीत 57 व द्वितीय श्रेणीत 13 विद्यार्थी उतीर्ण झाले.विज्ञान शाखेत मृणाल यशवंत मनवरे 650 पैकी 613,यशोदिप मोहन कांडलकर याला 612,तर जान्हवी विवेकानंद राउत हिला 603 गुण प्राप्त केले.जान्हवीला हिंदीमध्ये 96 गुण प्राप्त केले व शाळेचे नाव उज्वल केले.कला शाखेत नंदिनी शेंडे हिला 544,विशाखा सातपुते 538,तर प्रिंसी सदांशिवे हिला 513 गुण प्राप्त झाले.विज्ञान व कला शाखेतील सर्व उतीर्ण विद्यार्थ्यांचे व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वर्गाचे व्यवस्थापक मंडळाने अभिनंदन केले.