*शेतक-यांच्या संपूर्ण कर्ज माफी व शेतमालाला हमी भाव मीळावा या मागणी करीता अमरावती परतवाडा मार्गावर प्रहार चे तिव्र आंदोलन*

0
678
Google search engine
Google search engine

अचलपूर / श्री प्रमोद नैकेले /-


शेतक-यांना संपूर्ण कर्जमाफी व शेतमालाला हमी भाव द्यावा याकरिता संपूर्ण महाराष्ट्रात शेतक-यांचा संप सुरू आहे.या आंदोलनाला अचलपूरचे आमदार व प्रहार संघटनांनी पांठीबा जाहीर केला तसेच रस्त्यावर दुध व कांदा फेकून तिव्र आंदोलन सुरू केले.
महाराष्ट्रात शेतक-यांचे आंदोलन आता चाघळायला लागले आहे.भाजपा सरकारने निवडणूकी दरम्यान सातबारा कोरा करण्याचे आश्वासन दिले मात्र मोदीसरकारला सत्तेत येवुन तिन वर्षे पूर्ण झाली तरी महाराष्ट्रात पुर्ण कर्जमाफी तर झालीच नाही उलट शेतमालाला हमी भाव सुध्दा फडणवीस सरकार देत नाही.त्यामुळे अगोदरच सर्वात अधिक शेतकरी आत्महत्या झालेल्या महाराष्ट्राचा शेतकरी हवालदिल झाला आहे.सर्व विरोधकांनी याबाबत सरकारवर विविध उपक्रमातून दबाव आणण्याचा प्रयत्न केला मात्र सरकारला जाग आली नाही.उलट भाजपा चे मंत्री शेतक-यांना शिव्या देऊन अपमानीत करायला उतरलेले दिसत आहे.आज शेतमालाला हमी भाव नसल्याने कांद्याचे उत्पन्न कवडीमोलाचे झाले आहे.तुरीला भाव नसून तुर खरेदी शासनाने बंद करून शेतक-यांचा अंत पाहत आहे म्हणुन 1 जून पासून 7 जून या आठवड्यात राज्यातील बळीराजा संपावर गेलेला आहे.या आंदोलनाला अचलपूरचे आमदार व प्रहार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष बच्चू कडू यांनी सक्रीय पाठिंबा जाहीर केला व तिव्र आंदोलन ला सुरवात केली आज सकाळी दहा वाजता स्थानीक प्रहार संघटनेचे नेते बल्लू जवंजाळ,दिपक भोरे,नंदूभाऊ विधळे, दिपक धुळधर व नगरसेवक संजय तट्टे यांच्या नेतृत्वात अमरावती परतवाडा रोड वरील चांदूरबाजार नाक्यावर शेकडो कार्यकर्ते व शेतकरी यांनी कांदे व दुध रस्त्यावर फेकून मोदी व फडणवीस सरकार चा निषेध केला.याप्रसंगी महेश सुरंजे,संतोष बुरघाटे,गजानन भोरे,बंडू ठाकरे,राजू पाटील,साहेबराव मेहरे,रविंद्र भोंडे,आबाराव ठाकरे,मुन्ना शेळके,राहुल तट्टे,प्रशांत आवारे,मंगेश हुड,नितीन आखुड, मुस्तफाभाई, भास्कर मसोदकर,गुलाब डोंगरे,मालखेडे,राठी साहेब, मोहन वानखडे नितीन मांजरे,प्रवीण गुप्ता,नरेंद्र डोईफोडे प्रशांत आवारे,शिवबा काळे व असंख्य कार्यकर्ते व शेतकरी उपस्थित होते.त्यांनी मोदीसरकारच्या शेतकरी धोरणा बद्दलच्या उदासीनतेविरूध्द घोषणा देवून आपला निषेध नोंदवला आज रस्त्यावर दुध व कांदा सांडत आहे उद्या रक्त सुध्दा सांडायला आम्ही तयार आहोत.हातात नांगर पकडणा-या या जगाच्या पोशींद्याला तलवार सुध्दा घेता येते तेंव्हा शासनाने त्वरित शेतक-यांचे सातबारा कोरे करावे व शेतमालाला हमी भाव मिळवून द्यावा अन्यथा याही पेक्षा तिव्र आंदोलन करण्याचा इशारा आंदोलन कर्त्यांनी याप्रसंगी दिला.अचलपूर उपविभागीय पोलीस अधिकारी यांचे मार्गदर्शनाखाली परतवाडा पोलिस स्टेशन चे ठाणेदार सोळंकी,अचलपूरचे ठाणेदार सोनोने व सरमसपुरा पोलीस स्टेशन चे ठाणेदार अहिरराव यांनी चोख बंदोबस्त ठेवून आंदोलन शांततेत कोणताही अनुचित प्रकार न होता पार पाडले.रस्त्यावर दुध व कांदा टाकल्यामुळे ब-याच दुचाकी घसरून पडल्या पण प्रहार कार्यकर्ते धावून त्यांचे मदतीला जात होते अमरावती परतवाडा महामार्गावर बराचवेळ वाहतूक खोळंबून चक्का जाम झाला होता.पोलीस व महसुल प्रशासनाने त्वरित पाण्याचे टँकर बोलावून रस्ता स्वच्छ करून रहदारी पुर्ववत सुरळीत सुरु केली.