​प्राथमिक आरोग्य केंद्रात रुग्णांना उत्तम सेवा मिळावी-पालकमंत्री प्रवीण पोटे-पाटील

0
449
Google search engine
Google search engine

          अमरावती:  राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानांतर्गत शासनाकडून आरोग्याच्या अनेक योजना अंमलात आल्या आहेत. प्राथमिक आरोग्य केंद्र हे ग्रामीण भागातील रुग्णांसाठीचे महत्वाचे रुग्णालय असून तेथे उत्तम सेवा मिळण्यासाठी अधिकारी-कर्मचाऱ्यांनी प्रयत्न करावा, असे निर्देश पालकमंत्री प्रवीण  पोटे-पाटील यांनी आज येथे दिले.

          नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील मंगरुळ चव्हाळा येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीचा लोकार्पण सोहळा श्री. पोटे-पाटील यांच्या हस्ते झाला, त्यावेळी ते बोलत होते.

          खासदार रामदास तडस, आमदार विरेंद्र जगताप, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष नितीन गोंडाणे, बांधकाम सभापती जयंत देशमुख, आरोग्य सभापती बळवंत वानखडे आदी यावेळी उपस्थित होते.

          श्री. पोटे-पाटील म्हणाले की, रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांना योग्य सेवा मिळावी यासाठी अधिकारी-कर्मचाऱ्यांनी प्रयत्नशील रहावे. रुग्णालयात औषधांचा पुरेसा साठा असावा. रुग्णालय परिसराची स्वच्छता राखण्याची जबाबदारी सर्वांचीच आहे. नागरिकांनीही ही शिस्त पाळली पाहिजे. केंद्रात आवश्यक निवासस्थानांबाबत योग्य कार्यवाही केली जाईल.

          श्री. तडस म्हणाले की, शासनाकडून ग्रामीण  परिसरासाठी पाणी, आरोगय, स्वच्छतेच्या अनेक योजना राबविल्या जात आहेत. त्यामुळे गावांमध्ये अनुकूल बदल होत आहेत.

          श्री. जगताप म्हणाले की, प्राथमिक आरोग्य केंद्रात योग्य सेवा मिळाल्यास रुग्णांना शहरातील रुग्णालयात जाण्याची गरज पडणार नाही. त्यामुळे तशी दक्षता संबंधितांनी घ्यावी.

          श्री. गोंडाणे यांनीही मनोगत व्यक्त केले. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. एस.वाय.असोले यांनी प्रास्ताविक केले.