माजी केंद्रीय मंत्री सुबोध मोहिते यांचा काँग्रेसला कंटाळून शिवसंग्राम प्रणित भारतीय संग्राम परिषदेमध्ये जाहीर प्रवेश

0
966
Google search engine
Google search engine

मुंबई. ( शाहरुख मुलाणी ) –

आज मुंबई येथे शिवसंग्राम प्रणित भारतीय संग्राम परिषदेमध्ये माजी केंद्रीय मंत्री सुबोध मोहिते यांनी पक्ष प्रवेश केल्यावर मनोगत व्यक्त करताना सांगितले की, कॉंग्रेस पक्षाचे दिशाहीन झालेले नेतृत्व, पक्षांतर्गत गटबाजी व कॉंग्रेसच्या कार्यपद्धतीला कंटाळून निर्णय घेतला आहे.

काँग्रेसपक्षाने माझ्यासारख्या माणसाला कोणतीही जबाबदारी न देता रिकामे ठेवले व माझ्यासारखा कार्यक्षम कार्यकर्त्याला काँग्रेस मध्ये न्याय मिळत नसल्यामुळे व भवितव्य दिसत नसल्यामुळे मी काँग्रेस सोडण्याचा निर्णय घेतला आहे तसेच महाराष्ट्रामध्ये अनेक पक्ष समोर असताना मी महाराष्ट्रामधील बहुजन समाजाचे नेतृत्व करणारे आ. मेटे यांच्या शिवसंग्राम प्रणित भारतीय संग्राम परिषदेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला, शिवसंग्रामच्या माध्यमातून आ. मेटे यांनी व त्यांच्या सहकाऱ्यांनी बहुजन समाजाचे जे मूलभूत प्रश्न आहेत त्यामध्ये मराठा आरक्षण, शिवस्मारक, अण्णासाहेब पाटील महामंडळ, वयवाढ, शिक्षणाचे विषय अशा अनेक विषय हे त्यांनी केलेले आहेत, बहुजन समाजाच्या शिवसंग्राममध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे व येत्या 9 जून ला माझ्या शेकडोंच्या संख्येने प्रवेश करणार आहे. आ. मेटे यांनी सुबोध मोहिते यांचे भारतीय संग्राम परिषदेमध्ये स्वागत करून त्यांनी जो विश्वास व्यक्त केला आहे त्याबद्दल त्यांनी आभार व्यक्त केले त्यांच्या कार्याचा अनुभव व त्यांच्या नेतृत्वगुणाला संधी देण्याचे काम आमच्याकडून निश्चितच होईल, मोहिते हे पक्षात आल्यामुळे नक्कीच उभारी प्राप्त होईल याची खात्री आम्हाला आहे तरुण तडफदार नेत्याकडे आम्ही भारतीय संग्राम परिषदेच्या महाराष्ट्राच्या प्रदेश अध्यक्ष पदाची जबाबदारी देत आहोत, आम्हाला खात्री आहे की मोहिते आपला पक्ष महाराष्ट्रतील प्रमुख पक्षामध्ये नेतील असा विश्वास आ. मेटे यांनी व्यक्त केला. यावेळी शिवसंग्रामचे प्रदेश अध्यक्ष मा. तानाजीराव शिंदे यांनी मोहिते यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले, यावेळी व्यासपीठावर युवक प्रदेशाध्यक्ष राजेंद्र मस्के, सरचिटणीस विक्रांत आंब्रे, मुंबई अध्यक्ष दिलीप माने, बाबुराव पवार, संदीप पाटील, उदय आंबोनकर, विष्णुपंत भुतेकर, नानासाहेब भिसे, रमेश आंब्रे, शिवा मोहोड, प्रभाकर कोलांगडे, विजयकांत मुंडे, अशोक लोढा, भारत काळे आदी प्रमुख उपस्थित होते.