सुगंधी तंबाखु व मावा बनविणाऱ्या कारखान्यांवर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

0
846
Google search engine
Google search engine

*प्रतिनिधि / उमेर सय्यद*

अहमदनगर – अहमदनगर शहरातील मुकुंदनगर भागात गुरुप्रतिनिधिवारी सायंकाळी अन्न औषध प्रशासनाचे शिवराज लोहार व जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक रंजनकुमार शर्मा व अप्पर पोलिस अधीक्षक घनश्याम पाटिल यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षक पवार यांच्या नेत्रुत्वाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे सहाय्यक पोलिस निरीक्षक गुठ्ठे यांच्या पथकाच्या संयुक्त विद्यमाने सुगंधी तंबाखु व मावा तयार करणाऱ्या कारखाण्यावर वर छापा टाकून सुमारे सुगंधी तंबाखु , सुपारी व मावा तयार करणारी मशिनरि असा एकूण 13 लाख 18 हजार रुपयांचा मूद्देमाल जप्त केला आहे ! सध्या अहमदनगर शहरासह जिल्ह्यामध्ये सुगंधी तंबाखु व माव्याची सर्रास व राजरोस पणे विक्री होत आहे तसेच हे मावा तयार करण्याचे कारखानेच सद्या शहरासह जिल्ह्यात वास्तव्यास येत असल्यानेच स्थानिक गुन्हे स्थानिक गुन्हे शाखेच्या वतीने ही कारवाई करण्यात आली ! मात्र अन्न व औषध प्रशसनाची ही करवाई आगोदर पोलिस प्रशासन करते नंतर अन्न व औषध प्रशासन यांना पाचारण करण्यात येत असल्याने अन्न व औषध प्रसहसणाच अश्या कारखांन्या कडे जाणून बुजुन दुर्लक्ष तर केले जात नाही ना हाच प्रश्न जनतेला पडला आहे ! दरम्यान या कारवाईत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे सहाय्यक पोलिस निरीक्षक श्रीधर गुठ्ठे , मन्सूर सय्यद , विजय ठोंबरे , संदीप घोड्के , सचिन अड़बल , सुमेघा वाघमारे , यांच्यासह आदि पोलिस कर्मचारी यांचा सहभाग होता _