शहरातील वाढलेले गाजर गवत लवकर कापा भाजपाचे मुख्याधिकाऱ्यांना निवेदन

0
681
Google search engine
Google search engine

चांदुर रेल्वे – (शहेजाद खान )-

चांदुर रेल्वे येथील शहरातील शेंद्रीपुरा, अमरावती रोड परीसर व इतर भागातील गाजर गवत मोठ्या प्रामणात वाढले असुन हे गाजर  गवत कापण्याचे  निवेदन भाजपा  युवा मोर्चा व महिला आघाडीच्या वतीने मुख्याधिकाऱ्यांना देण्याच आले. मुख्याधिकाऱ्यांनी क्षणाचाही ￰विलंब  न करता  सोमवार पासुन शेंद्रीपुरा  ते अमरावती  रोडच्या सर्व भागामधील गांजर गवत व बाभूळची झाडे काढण्याचं आश्वासन दिले.
निवेदन देतांना भाजपाचे शहराध्यक्ष  प्रमोद नागमोते, युवा मोर्चाचे तालुका अध्यक्ष सचिन लांजेवार , युवा मोर्चा शहर अध्यक्ष  पवन ठाकुर, तसेच बाळासाहेब  सोरगिवकर , वरिष्ठ उपाध्यक्ष  गुड्डूभाऊ  बजाज , संदीप सोळंके,  चेतन  तितरे, मनोज जयस्वाल , केशव वंजारी , मुन्ना  शर्मा , हरीश  वऱ्हाडे  , सुभाष  मते  , अतुल शिरभाते,  संदीप मेश्राम व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.