सनातन प्रभातच्या पत्रकाराला पत्रकार परिेषदेला उपस्थित न रहाण्याविषयीचा संदेश पाठवला !

0
710
Google search engine
Google search engine

डॉ. भारत पाटणकर यांच्याकडून वृत्तपत्र स्वातंत्र्याची पुन्हा गळचेपी !

सातारा –

 

 

श्रमिक मुक्ती दलाचे अध्यक्ष डॉ. भारत पाटणकर यांची ११ ऑक्टोबरला येथे पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली आहे. या पत्रकार परिषदेला सनातन प्रभातच्या प्रतिनिधीने उपस्थित न रहाण्याविषयीचा संदेश श्रमिक मुक्ती दलाचे सातारा जिल्हाध्यक्ष डॉ. प्रशांत पन्हाळकर यांनी व्हॉट्सअ‍ॅपवरून पाठवला आहे आणि वृत्तपत्र स्वातंत्र्याची पुन्हा एकदा गळचेपी केली आहे. Vidarbha24news

यापूर्वी १२ सप्टेंबरला पत्रकार परिषदेचे अधिकृत निमंत्रण असतांनाही डॉ. पाटणकर यांनी सनातन प्रभातच्या पत्रकाराला पत्रकार परिषदेतून बाहेर जाण्यास सांगितले होते आणि आम्ही सनातन प्रभातच्या पत्रकाराला बोलावले नव्हते, असे धादांत खोटे सांगितले होते. याविषयीचे वृत्त साम या मराठी वृत्तवाहिनीवरही डॉ. पाटणकर यांच्या प्रतिक्रीयेसह प्रसारित झाले होते.