भाजपाच्या केंद्र सरकारकडून जाहीरनाम्यातील अनेक आश्वासने पूर्ण – भाजपा राष्ट्रीय उपाध्यक्ष खा. विनय सहस्रबुद्धेमुंबई. ( शाहरुख मुलाणी )

0
700
Google search engine
Google search engine

मुंबई. ( शाहरुख मुलाणी ) – 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भारतीय जनता पार्टीच्या आघाडी सरकारने लोकसभा निवडणुकीत जाहीरनाम्यात दिलेली अनेक आश्वासने पूर्ण केली असून काही बाबतीत आश्वासनांच्या पलीकडे जाऊन काम केले आहे. मोदी सरकारला शुक्रवार, 26 मे रोजी तीन वर्षे पूर्ण होत असून पक्षातर्फे देशभर जनतेला सरकारच्या कामगिरीचा हिशेब सादर करण्यात येत आहे, असे भाजपा राष्ट्रीय उपाध्यक्ष खा. विनय सहस्रबुद्धे यांनी गुरुवारी मुंबई येथे पत्रकार परिषदेत सांगितले.

खा. विनय सहस्रबुद्धे यांनी सांगितले की, महागाई कमी करणे, रोजगार निर्मिती, भ्रष्टाचाराला आळा घालणे, राज्यांना अधिक अधिकार, गरिबांचे सबलीकरण, अनुसूचित जाती, जमाती व ओबीसींचे कल्याण, शेतीचा विकास, महिलांचे सशक्तीकरण, दिव्यांगांचे अधिकार, लहान मुलांचे आरोग्य, पायाभूत सुविधांचा विकास आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर देशाची प्रतिष्ठा वाढविणे अशा अनेक बाबतीत भाजपाच्या निवडणूक जाहीरनाम्यातील आश्वासने मोदी सरकारने पूर्ण केली आहेत. ते म्हणाले की, देशामध्ये रोजगारनिर्मितीसाठी सरकारने केलेल्या प्रयत्नांमुळे अनौपचारिक क्षेत्रात रोजगार वाढले आहेत. मुद्रा योजनेत सात कोटी लोकांना कर्ज दिल्यामुळे त्यांच्या रोजगारनिर्मितीला मदत झाली आहेच पण त्यासोबत त्यांचे व्यवसाय वाढल्यामुळे त्यामार्फत इतर अनेकांना रोजगार मिळाला आहे. काश्मीरमध्ये केंद्र सरकार व राज्य सरकारने राबवलेल्या विकास योजनांचा परिणाम दिसू लागला आहे. त्यामुळे जनमत बदलू लागल्यानंतर बिथरलेल्या दहशतवाद्यांनी कारवाया वाढविल्या आहेत. त्यांनी सांगितले की, नीति आयोगाची स्थापना, रेल्वे आणि मुख्य अर्थसंकल्पाचे विलिनीकरण करणे, नीम कोटेड युरिया, आंतरराष्ट्रीय योग दिवस अशी अनेक जाहीरनाम्यात नसलेली कामेही सरकारने केली आहेत. खा. विनय सहस्रबुद्धे म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील टीमने राजकीय इच्छाशक्तीच्या जोरावर देशात सुशासन आणण्यासाठी पावले टाकली. सर्जिकल स्ट्राईक किंवा नोटबंदीचा निर्णय ही सरकारच्या इच्छाशक्तीची उदाहरणे आहेत. या सरकारने चांगल्या योजना तयार करतानाच त्यांच्या अंमलबजावणीवर भर दिला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हेतुविषयी शंका नसल्याने जनेतचा टिकावू पाठिंबा मिळाला आहे. या सगळ्यामुळे सरकारबद्दल विश्वासाचे वातावरण निर्माण झाले. भाजपा प्रदेश मुख्य प्रवक्ते माधव भांडारी, प्रवक्ते केशव उपाध्ये, गणेश हाके व कांता नलावडे यावेळी उपस्थित होते.