*महावितरणचा अजब कारभार निम्म्या जुळ्या शहराला रात्री उशिरापर्यंत ठेवले अंधारात* *कर्मचारी व अधिकारी संपर्क क्षेत्राच्या बाहेर*

0
613
Google search engine
Google search engine
अचलपूर / श्री प्रमोद नैकेले /-
एकतर उन्हाळा त्यात विद्युत पुरवठा बंद म्हणजे दुष्काळात तेरावा महिना अशी परिस्थिती होती अचलपूर परतवाडा जुळ्या शहरातील निम्म्या नागरिकांची.महावितरणचा अजब कारभार निम्म्या जुळ्या शहराला रात्री उशिरापर्यंत ठेवले अंधारात.
               सध्या उन्हाळ्याचे दिवस तापमान म्हणता तर अंगावर काटा उभा राहतो.सुर्य अक्षरशः आग ओकत आहे.दिवसभर तापत्या उन्हात आपले दैनंदिन उदरनिर्वाह करिता जिवाचा आटापीटा करून थकलेले जिव घरातील पंखा अथवा कुलरच्या हवेत विसावा घेतात त्यात जर लाईन बंद म्हटले तर दुष्काळात तेरावा महिनाच म्हणावे लागेल.असाच काहीसा अनुभव 20 मे च्या रात्री अचलपूर परतवाडा जुळ्या शहरातील निम्म्या नागरिकांना आला.संध्याकाळी सहा वाजता पासून जवळपास रात्री बारा नंतरही जुळ्या शहरात निम्म्या नागरिकांच्या घरातील लाईन बंद होती.उन्हाच्या उकाळ्यात नागरीक त्रस्त महावितरण चे कर्मचारी व अधिकारी मात्र संपर्क क्षेत्राच्या बाहेर त्यामुळे अक्षरशः नागरिक त्रासून गेले.महावितरण च्या कार्यालयात,कर्मचारी किंवा अधिकारी यांचे सोबत अनेक नागरिकांनी दूरध्वनीवरून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता सर्वांचे दूरध्वनी संपर्क क्षेत्राच्या बाहेर यामुळे नागरिकामध्ये असंतोष दिसत होता.विशेष म्हणजे पथदिवे व निम्म्या शहरातील नागरिकांची लाईन सुरू व उर्वरित निम्मे शहर अंधारात हा विचीत्र प्रकार बराच वेळ संभ्रमित करणारा ठरला जेंव्हा लाईन बंद असण्याचे कारण समजले तेंव्हा महावितरणच्या अजब कारभाराचा संताप सर्वच स्तरातून व्यक्त होत होता.33 केव्हीची लाईन टाकण्यासाठी महावितरणने निम्म्या शहराला वेठीस धरले होते तेही काही वेळ नव्हे तर जवळपास सात ते आठ तास अर्थात रात्री दोन च्या सुमारास लाईन सुरू करण्यात आली.दिवसभर कुलर व एसी मध्ये आराम करून महावितरणने हे महत्त्वाचे काम रात्रीच्या वेळी नागरिकांच्या सोबत जीवघेणा खेळ खेळून पुर्ण केले यामुळे नागरिकांमध्ये असंतोष निर्माण होवून महावितरण विषयी रोष व्यक्त करण्यात येत आहे व पुन्हा असे झाल्यास तो रोष शिगेला जाण्याची चर्चा ऐकायला येत आहे तरी महावितरण व त्यांच्या वरिष्ठ अधिकारी वर्गाने या गोष्टीचा गांभीर्याने विचार करून नागरिकांची अशी परीक्षा घेवू नये असा इशारा सुध्दा जनतेकडून देण्यात येत आहे.