भाजपा कार्यकर्त्यांनी शहरातील विविध कामांच्या मागण्यांचे मुख्याधिकाऱ्यांना दिले निवेदन मुख्याधिकाऱ्यांनी निवेदनाची वेळीच घेतली दखल

0
682
Google search engine
Google search engine

चांदुर रेल्वे – (शहेजाद खान ) –


चांदूर रेल्वे येथील शहर भाजपा उपाध्यक्ष व गटनेते संजय मोटवानी व नगरसेविका निलिमा शर्मा यांच्या नेतृत्वात शहरातील विविध कामांच्या मागण्यांचे मुख्याधिकाऱ्यांना नुकतेच निवेदन दिले आहे.
      निवेदनामध्ये शहरातील मोठ्या नाल्यांमध्ये बेशरमची झाडे वाढलेली असुन गाळ सुध्दा मोठ्या प्रमाणात जमा झालेला आहे. त्यामुळे मोठ्या नाल्यांसोबत इतर लहान सर्वच नाल्या पाऊस पडण्याच्या आधी साफ करून घ्याव्यात जेणेकरून पावसाळ्यात शहराती नागरीकाना कुठलाच ञास होणार नाही, नळाव्दारे शहराला पुरविण्यात येणारे पाणी हे दुषित असुन शुध्द पाण्याचा पुरवठा करण्यात यावा, पथदिवे दिवसाला हि सुरू असल्यामुळे न.प. तिजोरीवरील खर्च वाढत असुन याकडे लक्ष केंद्रीत करण्यात यावे आदी मागण्यांचा समावेश करण्यात आला होता. तसेच यावेळी नगर परिषदमधील निवृत्त कर्मचाऱ्यांच्या थकीत वेतन मुद्द्यावरही चर्चा करण्यात आली. मुख्याधिकारी यांनी वेळीच निवेदनाची दखल घेऊन शहरात पाहणी केल्याचे समजते. यावेळी नगरसेवक अजय हजारे, संजय पुरसाम, माजी न.प.अध्यक्ष छोटूभाऊ विश्वकर्मा, अॅड. राजीव अंबापुरे, मुन्ना शर्मा, गुड्डु बजाज, सचिन लांजेवार, केशव वंजारी, रमेश वाट, राजेश सोळंके, जाकिरभाई, गजानन वनवे, साबीरभाई, सदीप मेश्राम, बंडू गांवडेसह बहुसंख्य भाजपा कार्येकर्ते उपस्थिती होते.