आपत्ती व्यवस्थापनात समन्वय गरजेचा — जिल्हाधिकारी श्री ए. एस. आर. नायक

0
1084
Google search engine
Google search engine
येणा-या पावसाळयात संभाव्य नैसर्गिक आपत्तीसाठी सज्ज रहावे या काळात सर्व यंत्रणांनी समन्वय राखावा असे निर्देश जिल्हाधिकारी ए. एस. आर. नायक यांनी आज येथे दिले.
गडचिरोली जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची बैठक आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात झाली त्यात जिल्हयात पावसाळयाच्या पार्श्वभूमीवर आपत्ती व्यवस्थापन नियोजन तसेच आराखडा यांचा आढावा जिल्हाधिका-यांनी घेतला त्यावेळी ते बोलत होते.
या बैठकीस जि.प.अध्यक्षा योगिता भांडेकर यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी शान्तनु गोयल, सहायक जिल्हाधिकारी डॉ.बिपीन इटनकर, जि.प.चे उपमुख्य कार्यकारी अधिकारी जवळेकर, अधीक्षक अभियंता प्रदीप खवले, जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत दैठणकर, पोलिस उप अधिक्षक गणेश बिरादार, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कमलेश भंडारी आदींसह सर्व विभागाचे प्रमुख उपस्थित होते. जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाबाबत कृष्णा रेड्डी यांनी यावेळी सादरीकरण केले.
पावसाळाच्या पार्श्वभूमीवर सर्व तहसील कार्यालये, सार्वजनिक बांधकाम विभाग, पाटबंधारे विभाग, दुरसंचार विभाग तसेच नगरपालिका आदिना 1 जूनपासून 24 तास कार्यरत राहतील असे, नियंत्रण कक्ष स्थापन करावेत तसेच आरोग्य विभागाने 7 जून पासून याच स्वरुपाचे कक्ष कार्यान्वित करण्याचे निर्देश नायक यांनी यावेळी दिले.
वीज अटकाव यंत्रणा
सन 2013 ते 2016 या तीन वर्षाच्या कालावधीत वादळी पावसासोबत वीज कोसळण्याचे प्रकार होतात अशा घटनांमध्ये 28 जणांना मृत्यु आला. हे प्रमाण कमी करण्यासाठी अभ्यास करुन वीज पडण्याची शक्यता आहे. अशा ठिकाणांवर वीज अटकाव यंत्रणा (लायटनिंग अरेस्टर) लावण्यासंदर्भात काम सुरु आहे.
या वर्षी बी.एस.एन.एल. च्या टॉवरची संख्या वाढली आहे.वीज कोसळण्याची अधिक तिव्रता असणाऱ्या भागातील 48 टॉवरवर लायटनिंग अरेस्टर बसविण्यात येणार आहे, असे बी.एस.एन.एलचे उपमहाव्यस्थापक सय्यद यांनी यावेळी सांगितले यामुळे वीज पडून मृत्यू होण्याचे प्रमाण निश्चितपणे कमी होईल.
कोकण वगळता सर्वाधिक पाऊस
सन 2016 साली गडचिरोली जिल्हयात कोकण वगळता राज्यात सर्वाधिक पावसाची नोंद झाली. जिल्हयाची सरासरी पावसाची आकडेवारी नुसार नोंद 1502.3 मिमी इतकी आहे. गेल्या पावसाळयात 110 टक्के म्हणजे 1658.88 मिमी इतक्या पावसाची नोंद झाली होती. यात सर्वाधिक पाऊस मुलचेरा तालुक्यात 2293.6 मिमी इतका अर्थात 149.2 टक्के पाऊस नोंदला गेला होता.
जिल्हयात 40 मंडळ कार्यालयाच्या परिसरात पर्जन्यमापक बसविण्यात आलेले आहेत. याखेरीज पाटबंधारे विभागातर्फे 2 ठिकाणी पर्जन्यमापक ठेवण्यात आलेले आहेत.
संपर्क महत्वाचा
जिल्हयात पावसाळयात संपर्क तुटणाऱ्या एकूण गावांची संख्या 246 इतकी आहे. त्यापैकी 111 गांवाचा संपर्क 3 महिन्यांहून अधिक काळ राहत नाही. नद्यांना पूर आल्याने या गावांचा संपर्क तुटत असल्यामुळे या गावांमध्ये धान्य तसेच औषध साठा करुन ठेवण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या.
या गावात काम करणऱ्या शासकीय अधिकारी आणि कर्मचारी यांनी नियंत्राण कक्षांच्या संपर्कात रहावे असे निर्देश यावेळी देण्यात आले.