घुईखेड गावाची मराठवाड्यासारखी झाली परिस्थिती तब्बल आठ वर्षानंतरही घुईखेडचा पाणीप्रश्न ‘जैसे थे’ लोकप्रतिनीधींचे अद्यापही दुर्लक्षच पाण्याविना नागरिकांचे हाल

0
533
Google search engine
Google search engine

चांदुर रेल्वे – (शहेजाद खान )-

एकीकडे मराठवाड्यात भीषण पाणीटंचाईने रौद्ररूप धारण केले असतानाच दुसरीकडे अमरावती जिल्ह्यातील ‘घुईखेड’ हे गावसुद्धा ‘दुष्काळदाह’ सोसत आहे. केवळ २ टँकरने गावात पाणीपुरवठा होत असुन पर्यायी नळ, हातपंपांची दुरवस्था झाली आहे. गावातील विहिरीसुद्धा कोरड्या होण्याच्या मार्गावर आहेत. पाणीटंचाईच्या या भीषण वास्तवाचा घुईखेडच्या नागरिकांना सामना करावा लागत आहे. आठ- दहा दिवसांनी टॅंकरने केला जात असलेल्या पाणी पुरवठ्यामुळे पुनर्वसित नागरिकांचे चांगलेच हाल होत आहेत. मात्र याकडे संबंधीत विभागाने पाठ फिरवल्याचे पाहायला मिळत आहे.
     महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात उन्हाचा पारा चांगलाच तपत आहे. बेंबळा प्रकल्प, यवतमाळ अंतर्गत गेल्या ८ वर्षांपासून तालुक्यातील घुईखेड गावचे पुनर्वसन करण्यात आले. परंतु सुख सुविधाचा अभाव अजुनही जाणवत आहे. कारण गावामध्ये काही ठिकानी नळ कनेक्शन आणि विहीर, हॅन्डपंप करण्यात आले. पण त्याला पाणी नसल्याने गावकर्‍यांच्या पाण्याची चांगलीच फजिती होत आहे. घुईखेड येथील नागरिकांची पिण्याच्या पाण्याकरिता तडफड सुरू असल्याचे दृश्य गावांत दररोज बघायला मिळते. गोल्या आठ वर्षापासुन भीषण पाणीटंचाईचा सामना गावकऱ्यांना करावा लागतोय. २४०० लोकसंख्या असलेल्या गावात केवळ २ टैंकरने पाणीपुरवठा केला जात असल्यामुळे ८-१० दिवसांनी नागरीकांना पाणी मिळत आहे. अशातच अनेकांच्या घराजवळ भर उन्हात टैंकर येत असल्याने धकधकत्या उन्हाचा चढलेला पारा आणि पायाला लागणारी जमिनीवरील आग यामुळे लहान मुलांच्या, महिलांच्या जीवाची पाणी भरतेवेळी चांगलीच दमछाक होते.
       सद्या गावात चांगलीच संतापाची लाट पसरली आहे. घुईखेडचा पाणीप्रश्न तब्बल पुनर्वसन झाल्यापासुन अद्यापही कायमच आहे. मात्र तरीही या गंभीर समस्येकडे पालकमंत्री, स्थानिक आमदारांनी अद्यापही दुर्लक्षच केले आहे हे विशेष.