पत्रकार युसुफ खान यांचा सत्कार समारंभ संपन्न एसडीओ, तहसिलदार, ठाणेदार, बांधकाम अभियंता यांची उपस्थिती रोशन स्टोन क्रशरचे आयोजन

0
598
Google search engine
Google search engine

चांदुर रेल्वे – (शहेजाद खान )-



आपल्या लेखनीतुन समाजाचे ज्वलंत प्रश्न मांडून न्याय मिळवून दिला अशा महाराष्ट्रातील ५५  पत्रकारांना नवरत्न दर्पण पुरस्कार जळगाव येथील अखिल भारतीय ग्रामिण पत्रकार संघटनेच्या अधिवेशनात नुकताच प्रदान करण्यात आला. यामध्येच चांदूर रेल्वे येथील वृत्तकेसरी व प्रतिदिन अखबारचे तालुका प्रतिनीधी तथा अखिल भारतीय ग्रामिण पत्रकार संघटनेचे विदर्भ कार्याध्यक्ष युसुफ खान यांना सुध्दा जळगाव येथील खासदार ए.टी. नाना पाटील यांच्याहस्ते नवरत्न दर्पन पुरस्कार प्रदान करण्यात आला. याच अनुशंगाने तालुक्यातील सोनगाव येथील रोशन स्टोन क्रशरचे संचालक हमीदभाई यांनी युसुफ खान यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन केले होते. यावेळी उपविभागीय अधिकारी ललीत वऱ्हाडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.




           मंगळवारी स्थानिक विश्रामगृहात एका छोटेखानी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सदर कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणुन उपविभागीय अधिकारी ललीत वऱ्हाडे, तहसिलदार बी.ए. राजगडकर, ठाणेदार ब्रम्हदेव शेळके, बांधकाम विभागाचे अभियंता नांदुरकर, रोशन स्टोन क्रशरचे संचालक हमीदभाई, जेष्ठ पत्रकार प्रभाकरराव भगोले, वसंतराव कुळकर्णी, मतीनभाई, शेख जुनेद, अशोक पवार, राजेंद्र भुरे आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती. यावेळी उपविभागीय अधिकारी ललीत वऱ्हाडे व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते नवरत्न दर्पन पुरस्कार प्राप्त युसुफ खान यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. तसेच तळेगावचे जेष्ठ पत्रकार वसंतराव कुळकर्णी यांचाही पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.  उपविभागीय अधिकारी ललीत वऱ्हाडे यांनी आपल्या भाषणात म्हटले की, चांदुर रेल्वे सारख्या छोट्या तालुक्यातील पत्रकाराला राज्यस्तरीय पुरस्कार मिळणे ही मोठ्या अभिमानाची बाब आहे. ८ महिन्यांत ३ निवडणुकांमध्ये माझा शहरातील पत्रकारांशी जास्त संपर्क आला असुन सर्व एकजुटीने चांगले कार्य करीत आहे. त्यामुळे शहरातील पत्रकारांची अजुन प्रगती होऊन यापेक्षाही मोठा पुरस्कार मिळावा अशी आशा व्यक्त केली. या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन पत्रकार बाळासाहेब सोरगिवकर यांनी तर आभार प्रदर्शन अ.भा. ग्रा. पत्रकार संघटनेचे तालुकाध्यक्ष गुड्डु उर्फ प्रविण शर्मा यांनी केले.
        यावेळी जेष्ठ पत्रकार उत्तमराव गावंडे, गुड्डु उर्फ प्रविण शर्मा, बाळासाहेब सोरगिवकर, अमोल गवळी, विवेक राऊत, संजय मोटवानी, प्रशांत कांबळे, मनिष खुने, अभिजीत तिवारी, मंगेश बोबडे, इरफान पठान, रविंद्र मेंढे,  शहेजाद खान, मधुकर बावने, अमर घटारे, अजय गावंडेसह निमगव्हाणचे माजी सरपंच अरूणराव शेळके, डैडी मोहनानी, प्राचार्य पोकळे, प्रा. पुतळे, प्रा. धामंदे, राजेश जैन आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती.