सांवगी मग्रापूर गावात उन्हाळ्यात भिषण पाणी टंचाई. पिण्याच्या पाण्यासाठी विहिर अधिग्रहण 30 लाखाच्या पाणीपुरवठा योजनेचा बट्ट्याबोळ १९ मे च्या आढावा बैठकीत गाजणार मुद्दा ?

0
1071
Google search engine
Google search engine

चांदुर रेल्वे – (शहेजाद खान )-


चांदूर रेल्वे येथून 5 किलोमीटर अंतरावर असलेल्या सांवगी मग्रापूर गावात जिल्हा परिषद भारत निर्माण निधिमधून सन 2003 – 04 च्या दरम्यान गावातील नागरीकांच्या सोयीकरीता संरपच व स्थानिक सदस्यांनी सतत पाठपुरावा करून 30 – 35 लाखांची पाणीपुरवठा योजना आणली. यामध्ये नविन विहिर, मोटर पंप व 3 किलोमीटर पाईप लाईन टाकणे व विहिरीतील पाणी ग्रामपंचायत पर्यंत पोहचविणे असे अंदाजपञक बनवून चांदूर रेल्वे येथील ठेकेदारास काम देण्यात आले. कुठल्याही तांत्रिक बाबीचा अभ्यास न करता चूकीच्या जागी पाणी विहिरीची निवड व निकृष्ठ दर्जाचे पाईप व्यवस्थीत न जोडता तीन किलोमीटर पर्यंत पसरविण्यात आली व काही दिवसांतच ही पाईप लाईन पुर्णता खराब व लिकेज होऊन ग्रामपंचायतर्फे गावात होणारा पाणीपुरवठा पुर्णपणे बंद झाला असुन त्या दिवसापासून तर आजपर्यंत सांवगी मग्रापूर येथील नागरीकाना उन्हाळा आला की पाण्याच्या टंचाईचा मोठ्या प्रमाणात ञास होतो. अशात गावातील कोण्यातरी शेतकऱ्याच्या विहिरीवर अधिग्रहण करून ग्रामपंचायत मधील  नागरीकांना 3- 4 दिवसांच्या आड पाणी पुरवठा करून समाधान केले जाते. परंतु या योजनेत ज्यांनी मोठ्या प्रमाणात नागरीकांची व प्रशासनाची फसवणूक करून लाखो रुपयांचा मलीदा लाटला अशा ठेकेदार, अभियंता, ग्राम सचिवावर कुठलीच समिती चौकशी करीता नेमण्यात आली नाही. त्याच ठेकेदाराला पुन्हा आता टेंभुर्णी ग्रामपंचायत मध्ये नव्याने पाणी पुरवठा योजनेचे काम देण्यात आले. ते ही काम अशाच पध्दतीने पुर्ण केल्याची चर्चा सांवगी व टेंभुर्णी ग्रामपंचायत अंतर्गातील नागरीक करीत आहे. पुढे येऊन कुठलाही नागरीक तक्रार करीत नाही. कारण मोठ्या नेत्यांच्या आशिर्वाद असलेल्या ठेकेदार हे काम करीत असल्याचे नागरीकांचे म्हणणे आहे. येत्या 19 मे च्या आढावा बैठकीत सांवगी मग्रापूर व टेंभुर्णी ग्राम पंचायतचा मुद्दा मोठ्या प्रमाणात गाजणार असल्याची चर्चा दोन्ही शहरातील नागरीक करीत आहे.