अमरावती येथे विविध उपक्रमांच्या माध्यमातून धर्माभिमान्यांचा सहभाग

0
1013
Google search engine
Google search engine
  • मंदिर स्वच्छतेनंतर चैतन्याची आली प्रचीती

  • पुरोहितांकडूनही प्रार्थना

अमरावती – येथे परात्पर गुरु श्री श्री जयंत बाळाजी आठवले यांच्या अमृत महोत्सवानिमित्त विविध ठिकाणी प्रवचने, मंदिर स्वच्छता, साकडे घालणे, फलक लावणे असे उपक्रम घेण्यात येत आहेत.
१. बडनेरा मधील झिरी येथील श्री दत्तमंदिरासह एकूण ७ ठिकाणी हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी साकडे घातले. या वेळी मंदिरातील पुरोहितांनी स्वतः दत्तात्रेयाला प्रार्थना केली.
२. अमरावती शहरात आणि ग्रामीण भागात असे एकूण २५ ठिकाणी बैठका घेऊन अमृतमहोत्सवाचे प्रवचन घेण्यात आले.
३. एका ठिकाणी ग्रंथप्रदर्शनही लावण्यात आले.
४. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कार्याविषयीचे विविध आकारातील एकूण ९१ फलक चौकात लावण्यात आले. यासाठी अमरावती येथील सनातनचे हितचिंतक आणि धर्माभिमानी यांनी प्रायोजकत्व दिले. तसेच अमृत महोत्सवासाठी शुभेच्छा कळवल्या.
समाजातील महनीय व्यक्ती किंवा इतर राजकारणी अथवा कलाकार हे त्यांच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने स्वतःला केंद्रभूत ठेवून कार्यक्रम आयोजित करतात; मात्र राष्ट्र आणि धर्म यांसाठी अहोरात्र झटणारे परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले हे मात्र असे काही न करता हिंदुत्वनिष्ठांना राष्ट्र आणि धर्म यांसाठी कृती करण्यासाठी प्रेरणा देतात. त्यांच्या कृपेमुळेच या उपक्रमांना सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. यासाठी त्यांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करू, तेवढी अल्पच !