उद्यापासून विविध मागण्यांसाठी कृषी विक्रेत्यांचा दुकाने बंद

0
685
Google search engine
Google search engine

चांदुर रेल्वे : – (शहेजाद खान ) 

 

कृषी निविष्ठा विक्रेत्यांच्या मागण्याकडे लक्ष वेधण्यासाठी कृषी निविष्ठा विंक्री केंद्र उद्या 2 नोव्हेंबर 2017 ते 4 नोव्हेंबर 2017 या तिन दिवसांच्या कालावधीत बंद ठेवण्याचा इशारा चांदुर रेल्वे तालुका कृषी साहित्य विक्रेता संघ यांनी जिल्हाधिकारी यांना निवेदनद्वारे दिला आहे.
यवतमाळ जिल्ह्यात पिकांवर चुकीच्या पद्धतीने किटकनाशक औषधे फवारणी मुळे विषबाधा होऊन अनेक शेतकरी व शेतमजुराचा दुर्देवी मृत्यु झाला आहे. बरेच शेतकरी शेतमजुर बाधीत झाले असून या घडनेबाबत संघटना व कृर्षी केंद्रे दुखी आहेत या प्रकाराला केवळ कृर्षी निवीष्टा विक्रेते दोषी असल्याचा प्रचार करण्यात आला व विक्रेत्यांना जबाबदार धरुन त्यांच्या वर कारवाई केल्याने व्यवसाय सुरु ठेवणे कठीण झाले आहे. ज्या विक्रेत्यांवर चुकीचे गुन्हे दाखल करण्यात आले ते मागे घेण्यात यावे, निलंबित परवाने पुर्वेवत करावे, ऑनलाईन परवान्यात समाविष्ट अर्ज ग्राह्य धरावेत किटकनाशकाचे उंगम प्रमाणपत्र दाखल करण्या करीता मुदत घ्यावी अदी मागण्या करण्यात आल्या आहेत या मागण्यावर विचार करुन त्या बाबत सकारात्मक आदेश द्यावेत तसेन घडल्यास उद्या 2 ते  4 नोव्हेंबर 2017 या कालावधीत सर्व कृर्षी निविष्ठा विक्रेते बंद ठेवून त्यानंतर मागण्यांसाठी बेमुदत दुकाने बंद आणि धरणे आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. निवेदन देतेवेळी अध्यक्ष जयेंद्र टावरी, उपाध्यक्ष अमोल चांडक, सचिव गोपाळ वाघ यांसह तालुक्यातील अनेक कृषी केंद्र संचालक उपस्थित होते.