आधी खड्डा मग रेल्वे  – रेल्वेचा रस्ता खड्यात की खड्यात रस्ता @railminindia

0
483
Google search engine
Google search engine

बादल डकरे / चांदुर बाजार-

स्थानिक चांदुर बाजार येथील रेल्वे स्टेशन वर जाण्याकरिता प्रवाशी याना खड्यातून प्रवास करावा लागत असल्याचे चित्र चांदुर बाजार तालुक्यातील स्टेशन वर जाणाऱ्या रोडचे आहे. रेल्वे प्रशासन या संदर्भात गंभीर नाही का की मुद्दाम खाद्याचा प्रवास हा प्रवाशी याना करायला भाग पाडत आहे.असे अनेक प्रश्न तालुक्यात चर्चेचा विषय ठरत आहे.
चांदुर बाजार वरून नरखेड करीत दोन वेळा तर बडनेरा करीत 2 वेळा रेल्वे या स्टेशन वरून जाते त्यामुळे या ठिकानवरील रेल्वे स्टेशन वर मोठ्या प्रमाणात गर्दी तर राहतेच तसेच मोठ्या प्रमाणात ऑटो, मोटारसायकल सुद्धा येत असतात मात्र दीड किलोमीटर चा जो रेल्वे चा रोड आहे त्यावर मोठ्या अपघात होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.याची दखल रेल्वे प्रशासन कधी घेणार की काही जिवंत हानी झाल्यावर त्यांना जाग येणार हे प्रश्न आता चाहत्यावर आले आहे तर तिकडे कॉग्रेस युवक अचलपूर अध्यक्ष यांनी पण या विषयाची गंभीर दखल घेतली आहे.

रस्त्याची दुरुस्ती करा अन्यथा आक्रमक पवित्रा घेऊ :- श्री समीर देशमुख युवक कॉग्रेस अध्यक्ष

प्रवाशी ना ज्या खड्यातून प्रवास करावा लागतो त्यामुळे प्रवास करण्याची अर्धी मानसिकता त्यांची खड्यातच राहून जाते रेल्वे प्रशासन यांनी या संदर्भात लवकरात लवकर उपाय योजना न केल्यास आम्ही त्यांना त्यांची योग्य काम करण्याची पद्दत समजून सांगू.