दुसऱ्याही दिवशी कृषी सेवा केंद्र बंद ! – शेतकऱ्यांना विविध कृषी वस्तूंसाठी करावा लागत आहे अडचणींचा सामना

0
937
Google search engine
Google search engine

चांदुर रेल्वे – (शहेजाद  खान) –

चांदुर रेल्वे तालुका कृषी सा­हित्य विक्रेता संघटनेच्या वतीने २ ते ४ नोव्हेंबर या कालावधीत तालुक्यातील कृषी केंद्र बंद ठेवण्याचा इशारा देण्यात आला होता. त्यामुळे गुरूवारी तालुक्यातील कृषी केंद्र बंद ठेवण्यात आले होते. त्यानंतर दुसऱ्या दिवशी शुक्रवारी सुध्दा सर्वच कृषी केंद्र बंद होते.

संपुर्ण महाराष्ट्रातील कृषी केंद्र संचालक आपल्या विविध मागण्यांसाठी २ ते ४ नोव्हेंबरपर्यंत संपावर गेले आहे. गुरूवारनंतर शुक्रवारीसुध्दा कृषी केंद्र बंदच असल्यामुळे तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांना विविध कृषी वस्तूंसाठी अडचणींचा सामना करावा लागत आहे. तालुक्यातील गांधी कृषी सेवा केंद्र, चांडक कृषी केंद्र, ललीत कृषी केंद्र, जयश्री कृषी केंद्र, कृषीवैभव अॅग्रो एजन्सीज, आरूष कृषी  केंद्र, पाटील कृषी केंद्र, कृषी कल्पतरू, श्री साई अॅग्रो एजन्सीज, रंगोली कृषी सेवा केंद्र, चर्जन अॅग्रो एजन्सीज, प्राजक कृषी सेवा केंद्र,  अश्वीनी कृषी उद्योग, शिवार कृषी केंद्र, शिवकृपा कृषी केंद्र, कणसे अॅग्रो सर्व्हीस सेंटर, कार्तीक कृषी सेवा केंद्र, जयस्वाल कृषी सेवा केंद्र, जय माँ कृषी सेवा केंद्र, श्रेया कृषी केंद्र, श्रीनाथ कृषी केंद्र, सुरेश कृषी केंद्र, सुरेंद्र कृषी केंद्र, धनश्री कृषी सेवा केंद्र, भुषण कृषी केंद्र, तिरूपती कृषी केंद्र, दिशा लोकसंचालित साधन कृषी सेवा केंद्र यांसह तालुक्यातील एकुण ३५ कृषी सेवा केंद्र दोन दिवसांपासुन बंद आहे. आज तिसऱ्याही दिवशी कृषी सेवा केंद्र बंद राहण्याची शक्यता असुन शेतकरीवर्ग मात्र कृषी सेवा केंद्र उघडण्याची वाट बघत आहे..