भारतीय विज्ञान संमेलनाचे केंद्रीय राज्यमंत्री राज्यवर्धनसिंह राठोड यांच्या हस्ते उद्घाटन

0
630
Google search engine
Google search engine
पुणे राज्य सरकार, विज्ञान भारती आणि डेक्कन एज्युकेशन सोसायटी यांच्या वतीने आयोजित पाचव्या भारतीय विज्ञान संमेलनाचे उद्घाटन केंद्रीय माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री राज्यवर्धनसिंह राठोड यांच्या हस्ते शुक्रवारी (१२ मे) पुण्यात झाले. राज्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे, जेष्ठ शास्त्रज्ञ प्रा.एम .एम.शर्मा, डॉ. गोविंद स्वरूप, डॉ. विजय भटकर आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी श्री राठोड यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली विज्ञान तंत्रज्ञान आणि इतर क्षेत्रात होत असलेल्या बदलांचा आढावा घेतला. डिजिटल इंडिया चे क्षेत्र गावपातळी पर्यंत विकसित करण्यात येत असल्याने त्यांनी सांगितले. या क्षेत्रात भारताने केलेल्या कामगिरीची जगात प्रशंसा होत असल्याचेही त्यांनी नमूद केले.
 संशोधनात गुंतवणुकीची गरज असल्याचे सांगून ते म्हणाले की ‘मेक इन इंडिया’ सारख्या कार्यक्रमामधून संरक्षण क्षेत्रात देशांतर्गत संशोधनाचा चालना मिळत आहे. त्याचबरोबर योगाच्या माध्यामातून पारंपरिक भारतीय जीवनशैलीचा प्रसार होत आहे. ग्रामीण भागातील गरजांसाठी स्थानिक संशोधकांना प्रोत्साहन देण्याची आवश्यकता असल्याचेही त्यांनी सांगितले.
 या संमेलनाच्या निमित्ताने एका पुस्तिकेचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते झाले. फर्ग्युसन महाविद्यालयाच्या मैदानात आयोजित विज्ञान प्रदर्शनाला खूप चांगला प्रतिसाद मिळत असून हे प्रदर्शन रविवार पर्यंत (दि. १४ मे) राहणार आहे.