सरकारविरोधात एकदिवसीय धरणे आंदोलन व निदर्शने सुकाणु समिती, चांदुर रेल्वेचे आयोजन

0
923
Google search engine
Google search engine

चांदुर रेल्वे – (शहेजाद खान )

भाजप सरकारने शेतकर्‍यांना देशोधडीला लावले असून शेतकर्‍यांचे मरण ठरलेल्या सरकारच्या धोरणांचा निषेध नोंदवण्यासाठी राज्य शेतकरी सुकाणू समितीने जाहीर केल्याप्रमाणे शुक्रवार दि. 10 नोव्हेंबरला स्थानिक तहसील कार्यालयासमोर एक दिवसीय धरणे आंदोलन व सरकार विरोधात निदर्शने करण्यात आली.

केंद्रात व राज्यात सत्तापरिवर्तन होऊन भाजपचे सरकार सत्तेवर येऊन तीन वर्षे उलटली. या तीन वर्षांच्या कार्यकाळात सरकारने सातत्याने शेतकरी विरोधी भूमिका घेऊन शेतकर्‍यांचा अतोनात छळ केला. शेतीमालाला उत्पादन खर्चाच्या दीडपट हमीभाव देण्याचे आश्‍वासन पाळले नाही. शेतीमालावर निर्यातबंदी, नोटाबंदीच्या निर्णयामुळे शेतकरी उद्ध्वस्त झाला. फसवी कर्जमाफी योजना जाहीर केली. सोयाबीन, कापूस, मका,अन्नधान्य आदी शेतीमाल आधारभूत किंमतीपेक्षा कमी दराने खरेदी केला जात असताना शासकीय खरेदी केंद्र सुरु करण्यास जाणीवपूर्वक टाळाटाळ करुन शेतकर्‍यांना लुटल्याचा आरोप करण्यात आला. शेतकर्‍यांच्या प्रश्‍नावर भाजपचे सरकार अपयशी ठरले असून तीन वर्षांच्या कार्यकाळात शेतकर्‍यांना देशोधडीला लावले आहे. शेतकर्‍यांच्या ज्वलंत प्रश्‍नांवर शुक्रवारी स्थानिक तहसिल कार्यालयासमोर एकदिवसीय धरणे आंदोलन व निदर्शने चांदुर रेल्वे तालुका सुकाणु समितीच्या वतीने करण्यात आले. या दरम्यान शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांचे निवेदन तहसिलदारांमार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठविण्यात आले. यावेळी किसान सभेचे अध्यक्ष कॉ. देविदास राऊत, भाकपाचे कॉ. विनोद जोशी, आम आदमी पार्टीचे नितीन गवळी, शेतकरी संघटनेचे विलासराव आसोले, प्रहार शेतकरी संघटनेचे सौरभ इंगळे, कॉ. प्रफुल ढगे, कॉ. विजय रोडगे, कॉ. सागर दुर्योधन,  महेमुद हुसेन, राजाभाऊ भैसे,  भिमराव खलाटे, अरविंद भैसे, भिमराव बेराड,  विनोद लहाने, प्रभाकरराव कडु, गजानन भैसे, पंकज गुडधे, प्रभुराज इंगळे, प्रफुल बनसोड, कॉ. गणेश तुमरे, सचिन इमले, कॉ. भिमराव दांडेकर, कॉ. कृष्णकुमार पाटील यांसह तालुक्यातील शेतकरी उपस्थित होते.