अज्ञात वाहनाच्या धडकेत दोन ठार

0
738
Google search engine
Google search engine

पंढरपूर:-

गोपाळपूर येथे शनिवारी रात्री उशिरा अज्ञात वाहनाने बुलेटला ( एमएच १३. १००१) धडक दिल्याने झालेल्या अपघातात मंगळवेढ्याचे दोन युवक जागीच ठार झाले.

राहुल पंडित वाडदेकर आणि सिताराम पांडुरंग खंडागळे असे अपघातातील मृत युवकांची नावे आहेत. मंगळवेढ्यातील मनशांती कोल्ड्रिंकचा मालक असलेला सीताराम खंडागळे आपल्या मित्रांसोबत शनिवारी रात्री पंढरपूरला आला होता असे समजते.

रस्त्यावर कोणी नसल्याने हा अपघात नेमका कधी घडला हे समजू शकले नाही. मध्यरात्रीच्या सुमारास हा अपघात झाल्याची शक्यता आहे. पुढील तपास पंढरपूर तालुका पोलीस करीत आहेत.