*राष्ट्रीय प्रेस दिनी छोट्या व मध्यम वृत्तपत्रांच्या विविध मागण्यासाठी दि. 16 रोजी असोसिएशन ऑफ स्मॉल अॅण्ड मिडियम न्युज पेपर्स ऑफ इंडिया या संघटनेचे निवेदन अभियान*

0
831
Google search engine
Google search engine

सांगली – छोट्या व मध्यम वृत्तपत्रांच्या विविध मागण्यासाठी राष्ट्रीय प्रेस दिनी दि. 16/11/2017 रोजी असोसिएशन ऑफ स्माॅल & मिडीयम न्युज पेपर्स ऑफ इंडिया महाराष्ट्र प्रदेश शाखेच्या वतीने राज्यात प्रत्येक जिल्हयात पुन्हा निवेदन अभियान राबवून शासनाचे लक्ष छोट्या व मध्यम वृत्तपत्रांच्या समस्या व मागण्या कडे वेधण्यात येणार असल्याची माहिती राज्य अध्यक्ष आप्पासाहेब पाटील व राज्य महासचिव प्रदीप कुलकर्णी यांनी दिली.
राज्य शासनाने द्विवार्षीक पडताळणी च्या नावाखाली जवळपास 40 % वृतपञाना नोटीसा दिल्या असुन शासनाला छोटी वृत्तपत्रे बंदच करायची आहेत अशी भावना संपादक मालक वर्गात निर्माण झाली आहे. सर्व वृत्तपत्रांची निकोप वाढ व्हावी यासाठी 2001 ला जाहिरात धोरण ठरवणारा शासन निर्णय झाला. पण गेल्या सतरा वर्षात जाहिरात धोरणातील वृतपत्रांना पूरक अशा आर्थिक तरतूदींच्या कलमांची काटेकोरपणे अंमलबजावणी न झाल्याने छोट्या व मध्यम वृत्तपत्रांवर खुप अन्याय झाला आहे. 2001 च्या शासन निर्णयाची काटेकोरपणे अंमलबजावणी करीता गेली सतरा वर्ष निवेदने, बैठका, धरणे, आंदोलने , उपोषण, कार्यशाळा या प्रकारे प्रयत्न करूनही काटेकोर अंमलबजावणी झालेली नाही त्यामुळे छोटी व मध्यम वृत्तपत्रे आर्थिक अडचणीत आली आहेत यासाठी आपल्या संघटनेने वारंवार शासनाकडे विनंती करुन पाठपुरावा केला आहे.तसेच जिल्हा माहिती अधिकारी, उपसंचालक, संचालक यांना निवेदने यापूर्वी दिली आहेत. 2001 च्या शासन निर्णयाची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी यासाठी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात कार्यशाळा आयोजीत करुन या कार्यशाळेत जाहिरात वितरण करणारे अधिकारी व कर्मचारी यांना बोलाऊन जाहिरात धोरण अंमलबजावणी बाबत मार्गदर्शन करावे अशी मागणीही वारंवार करण्यात आली आहै. परंतु माहिती खात्याचे अधिकारी यासाठी पुढाकार घ्यायला तयार नाहीत आणि ज्या काही चार दोन जिल्ह्यात कार्यशाळा घेण्यात आल्या तिथेही या जाहिरात धोरण अंमलबजावणी बाबत काहीच घडले नाही ही शोकांतिका आहे.
गेल्या बारा वर्षात जाहिरात दर वाढवले नाहीत. सार्वजनिक बांधकाम खात्याने वेगळे परिपञक काढून साप्ताहिकाच्या जाहिराती जवळपास बंदच केल्या आहेत त्यामुळे ही वृत्तपत्रे आर्थिक डबघाईला आली आहेत एकंदरीत राज्य शासनाचे धोरण हे छोट्या व मध्यम वृत्तपत्रांवर अन्यायकारक व मारक असे ठरत आहे. या धोरणाला विरोध करण्यासाठी व छोट्या व मध्यम वृत्तपत्रांच्या विविध मागण्यासाठी दि 16/11/2017 रोजी राष्ट्रीय पञकार दिनाच्या निमित्ताने पुन्हा एकदा राज्यभर निवेदन अभियान असोसिएशन ऑफ स्माॅल & मिडीयम न्युज पेपर्स ऑफ इंडिया महाराष्ट्र प्रदेश शाखेच्या वतीने राबविण्यात येणार आहे. प्रत्येक जिल्ह्यातील जिल्हा माहिती अधिकारी कार्यालयात जाऊन जिल्हा माहिती अधिकारी यांना मागण्यांचे निवेदन सादर केले जाणार आहे. या अभियानातुन राज्य शासनाने मागण्या मंजूर केल्या नाहीत तर हे आंदोलन तीव्र करण्यात येईल व या आंदोलनाची पुढील रुपरेषा लवकरच ठरवली जाईल. तेव्हा दि 16/11/2017 रोजीचे हे आंदोलन यशस्वी करावे असे आवाहन राष्ट्रीय उपाध्यक्ष बी आर कुमार , राष्ट्रीय सचिव अजित म्हाञे , अध्यक्ष आप्पासाहेब पाटील, कार्याध्यक्ष सुमित कुलकर्णी, उपाध्यक्ष डी के आरीकर , शामसुंदर शर्मा, महिला आघाडी प्रमुख तेजस्विनी सुर्यवंशी, महिला सचिव सौ शोभा जयपुरकर, सचिव गोरख तावरे, संघटक प्रवीण पाटील, राष्ट्रीय कौन्सिल मेंबर जयपाल पाटील व चंद्रशेखर गायकवाड , महासचिव प्रदीप कुलकर्णी यांनी केले आहे.