निर्भया बलात्कार प्रकरण – चारही दोषी आरोपींची फाशीची शिक्षा कायम

0
638
Google search engine
Google search engine

नवी दिल्ली : साऱ्या देशाला शरमेनं मान खाली घालायला लावणाऱ्या निर्भया बलात्कार आणि हत्येप्रकरणी 4 आरोपींच्या फाशीच्या शिक्षेविरोधातल्या अपीलावर आज अंतिम निकाल होता. 13 मार्च 2014 रोजी दिल्ली उच्च न्यायालयानं चारही आरोपींची फाशीची शिक्षा निश्चित केली आहे.  मुकेश, पवना, विनय शर्मा आणि अक्षयकुमार सिंह या चौघा ना फाशी च होणार आहे कारण सुप्रीम कोर्टाचा खंडपीठाने हि शिक्षा कायम ठेवली आहे
फाशीच्या निर्णयाविरोधात आरोपी मुकेश, पवना, विनय शर्मा आणि अक्षयकुमार सिंह या चौघा आरोपींनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. त्यावर न्यायमूर्ती दीपक मिश्रा, आर भानुमती, आणि अशोक भूषण यांच्या खंडपीठाने अंतिम निकाल दिला. २३ वर्षाच्या निर्भयावर १६ डिसेंबर २०१२ रोजी निर्घृण बलात्कार करून तिला रस्त्याच्या कडेला फेकून देण्यात आलं. त्यानंतर 29 डिसेंबरला सिंगापूरच्या रुग्णालयात तिचा मृत्यू झाला. या प्रकरणी एकूण सहा आरोपींना अटक करण्यात आली. त्यापैकी एकानं तुरूंगात आत्महत्या केली. सत्र न्यायालयानं चारही आरोपींनी फाशीची शिक्षा सुनावली.