गजानन खोपे / वाठोडा शुक्लेश्वर :-
खोलापूर पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या वाठोडा शुक्लेश्वर येथे अवैध देशी दारु विक्री करीत असल्याची गोपनीय माहिती खोलापूर पोलीसांना मिळाली त्या माहिती च्या आधारे आरोपी च्या घरातून अवैध देशीदारू पोलिसांनी जप्त केल्याची घटना काल २२नोव्हेंबर रोजी दुपारी २.३०वाजताच्या सुमारास घडली, रवी खंडारे,वय३०वय शाम जांभे.वय २८वय दोन्ही रा.वाठोडा शुक्लेश्वर असे आरोपीचे नाव आहे, आरोपीच्या ताब्यातून २७ देशी दारू च्या पावट्या एकुण ३६५० रूपयांचा मुद्दलमाल जप्त केला, ठाणेदार सतीश चवरे यांच्या मार्गदर्शनात पी.एस.आय.खंडारे,पोलीस, शिपाई दिनेश ईगोले, पुढील तपास करीत आहे,