8 वर्षा पासून विविध गुन्ह्यातील आरोपीला गोंदिया येथून अटक – आसेगाव चे ठाणेदार अजय आकरे यांनी तांत्रिक माहितीच्या उपयोग करून केली अटक.

0
959
Google search engine
Google search engine

बादल डकरे / चांदुर बाजार –

आसेगाव पोलीस स्टेशनमध्ये अपराध क्रमांक 114/8कलम 283,337,338,304 भादवी तसेच सह कलम 122/177 मो.वा. का.मधील आरोपी दिनेश विध्यानाथ शर्मा वय 48 वर्ष कोलकत्ता हा फरार होता.आसेगाव चा पदभार अजय आकरे यांनी घेतला तेव्हापासून त्यांनी अनेक पेंडिंग केसेस निकाली लावल्या.

वरील आरोपी या मागील 8 वर्षांपासून फरार होता त्यांना तांत्रिक माहितीच्या आधारे आसेगाव चे ठाणेदार यांनी आरोपीचे लोकेशन चेक करून त्यांला अटक करण्यासाठी आपली एक टीम पाठवली आणि त्याचे लोकेशन गोंदिया होते.आसेगाव येथील नाईक पोलीस कॉस्टबल रवी पाखरे , पोलीस कॉस्टबल अमित मूळे सापळा रचून अटक करण्यात आली.त्याला कोर्ट मध्ये हजर केले असता त्या 2 महिने कारावास,4450 रुपये दंड अशी शिक्षा सुनावण्यात आली.

आसेगाव मधील अनेक रहस्य मय आणि पडद्या आळ असलेले अनेक गुन्हे उघड होत असल्याचे चित्र दिसत आहे.