आरोपीचा पाठलाग करतांना पोलीसांची गाडी पलटली पोलीस अधिकाऱ्यासह ४ कर्मचारी जखमी

0
866
Google search engine
Google search engine

चांदुर रेल्वे – (शहेजाद खान ) 

आरोपीचा पाठलाग करताना चांदुर रेल्वे पोलिसांची कार तालुक्यातीस सातेफळ जवळ पलटी झाल्याची घटना घडली आहे. . यामध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षकासह ४ पोलीस कर्मचारी जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे.
चांदुर रेल्वे पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विवेकानंद सखाराम राऊत (४२) आपल्या कर्मचाऱ्यांसह स्वत:च्या मारुती वॅगनार एमएच ४६ झेड ४१२३ या कारने आरोपीचा पाठलाग करीत होते. याच दरम्यान वळणावर अज्ञात वाहनाने पोलीसांच्या कारला कट मारल्यामुळे सातेफळ नजीक  पोलीसांची कार पलटी झाली. यात सहाय्यक पोलीस निरीक्षकासह  भारत लसनते (३२), शेख गणी (२७), शरद खेडकर (२८), विजय तिवारी (२८) असे ४ पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत. सदर घटना तळेगाव पोलीस स्टेशन हद्दीत घडल्यामुळे तळेगाव पोलिसांनी या घटनेची नोंद केली आहे.