अधिवक्त्यांचे संघटन झाले, तर हिंदु राष्ट्राची स्थापना करणे सहज शक्य ! – अधिवक्ता संजीव पुनाळेकर, सचिव, हिंदु विधीज्ञ परिषद

0
643
Google search engine
Google search engine

रामनाथी, गोवा – आज आपण अन्यायाच्या विरोधात लढत आहोत. त्यासाठी आपल्यात आवाज उठवण्याचे सामर्थ्य हवे. हे सामर्थ्य येण्यासाठी आपल्याला कार्य वाढवण्यासमवेत अधिवक्त्यांचे संघटन केले पाहिजे. हे संघटन झाले, तर आपल्याला हिंदु राष्ट्राची स्थापना करणे सहज शक्य आहे, असे प्रतिपादन हिंदु विधीज्ञ परिषदेचे राष्ट्रीय सचिव तथा ६६ टक्के आध्यात्मिक पातळीचे अधिवक्ता संजीव पुनाळेकर यांनी केले. रामनाथी, गोवा येथे सनातनच्या आश्रमात २६ डिसेंबरपासून राष्ट्रीय स्तरावरील ‘तृतीय अधिवक्ता अधिवेशना’ला आरंभ झाला.

हे अधिवेशन २८ डिसेंबरपर्यंत चालणार आहे. या वेळी शिबिरार्थ्यांना संबोधित करतांना ते बोलत होते. या अधिवेशनामध्ये ४० अधिवक्ते सहभागी झाले आहेत.

अधिवेशनाच्या प्रारंभी सनातन साधक-पुरोहित पाठशाळेचे श्री. सौरभ सप्रे यांनी शंखनाद केला. वेदमूर्ती आेंकार पाध्ये आणि वेदमूर्ती सिद्धेश करंदीकर यांनी वेदमंत्रपठण केले. या वेळी केंद्र सरकारचे माजी सांस्कृतिक सल्लागार तथा ६३ टक्के आध्यात्मिक पातळीचे प्रा. रामेश्‍वर मिश्र, हिंदु विधीज्ञ परिषदेचे संस्थापक-सदस्य तथा ६८ टक्के आध्यात्मिक पातळीचे अधिवक्ता सुरेश कुलकर्णी, अधिवक्ता संजीव पुनाळेकर आणि हिंदु जनजागृती समितीचे केंद्रीय समन्वयक तथा ६५ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. नागेश गाडे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. त्यानंतर भगवान श्रीकृष्णाचा श्‍लोक आणि प्रार्थना करून अधिवक्ता अधिवेशनाला प्रारंभ करण्यात आला.

आपल्या मार्गदर्शनात अधिवक्ता पुनाळेकर पुढे म्हणाले की,

१. अधिवक्त्यांनी व्यापक स्तरावर कार्य करणे आवश्यक आहे. आपण सातत्याने कार्य करत राहिलो, तर आपल्याशी नागरिक आपोआप जोडले जातील. आपण नवनवीन अधिवक्त्यांना या कार्यात जोडून घेतले पाहिजे.

२. प्रसारमाध्यमांपर्यंत आपले कार्य पोहोचवणे, तसेच हिंदुत्वनिष्ठांमध्ये आपल्याप्रती विश्‍वास निर्माण करणेही आवश्यक आहे.

३. आज हिंदूची प्रतिमा केवळ गोमांस खाणार्‍याला विरोध करणारा, त्रिशूल धारण करणारा, अशी निर्माण करण्यात आली आहे, ती आपल्याला पुसायची आहे.

४. आज घटनेच्या माध्यमातून आपल्याला गल्लाभरू विचारस्वातंत्र्य देण्यात आले आहे. आपल्याकडे अफझलखान वधाचे चित्र लावण्यास प्रशासनाकडून आक्षेप घेतला जातो; मात्र राणी पद्मावतीचे आक्षेपार्ह चित्रण करण्यात कोणतीच अडचण नसते.

५. आजची देश आणि धर्म यांची परिस्थिती पहाता येणार्‍या काळात देशात अराजक निर्माण होईल. त्यानंतर पुनर्निर्माण करण्यासाठी  लढायचे आहे. त्याकरिता धर्माभिमानी अधिवक्त्यांची आपल्याला आवश्यकता आहे.