आयएफएससी मुंबई येथेच होणार – आ. श्री आशीष शेलार

0
1590
Google search engine
Google search engine

2005 पासून काँग्रेसने झोपा का काढल्या हे सचिन सावंतांनी सांगावे !

मुंबई. ( शाहरुख मुलाणी ) – मुंबईतील आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र (आयएफएससी) गुजरातला पळविले, असा हास्यास्पद आरोप काँग्रेसचे सचिन सावंत यांनी केला आहे. पण, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रयत्नातून मुंबईत आयएफएससी होणारच, असे ठाम प्रतिपादन मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार अॅड. आशीष शेलार यांनी केले आहे.

आ. आशीष शेलार म्हणाले की, मुळात गुजरातच्या गिफ्ट सिटीचे काम हे काँग्रेसच्या काळात सुरू झाले, तेव्हा महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांनी झोपा काढल्या नसत्या, तर आज महाराष्ट्रातील आयएफएससी हे देशातील पहिले राहिले असते. तसाही आयएफएससी हा संपूर्णत: राज्याचा प्रकल्प आहे. एसईझेडसाठी केंद्राची परवानगी आवश्यक असते. अर्थात नॉन-एसईझेडमध्येही ते होऊ शकते. केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांनी संसदेत उत्तर देताना सुद्धा केंद्र सरकार गिफ्ट सिटीच्या उपयोगीतेचा पूर्ण वापर झाल्याशिवाय केंद्र सरकार दुसरे करणार नाही, असे म्हटले आहे. पण, मुंबईतील आयएफएससी हे महाराष्ट्र सरकार स्वत: करते आहे आणि त्यात केंद्राची मदत मागितली नाही. आणखी महत्त्वाचे म्हणजे यासाठीच काल स्वत: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांची भेट घेतली. त्यांनीही या चर्चेत हे स्पष्ट केले की, राज्य सरकार स्वत: बीकेसी येथे आयएफएससी करणार असेल तर केंद्र सरकार त्यावर आक्षेप घेणार नाही, असेही आ. आशीष शेलार यांनी म्हटले आहे. मुळात आयएफएससी मुंबईत स्थापन करण्याची संकल्पना ही 2005 साली मांडण्यात आली. 2014 पर्यंत या संकल्पनेवर राज्यातील काँग्रेस सरकार ठाण मांडून बसली होती आणि त्यांनी काहीच केले नाही. दरम्यान, 2012 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी गिफ्ट सिटीची सुरूवात केली. त्यामुळे या प्रश्नावर कांगावा करण्याचा काँग्रेसला अधिकार तरी आहे काय, असाही प्रश्न आ. आशीष शेलार यांनी उपस्थित केला आहे.