आज ढोले हॉस्पीटलमध्ये न्युरोपॅथी व बीएमडी तपासणी शिबीर

0
731
Google search engine
Google search engine

चांदुर रेल्वे – (शहेजाद खान ) –

शहरातील मुख्य रस्त्यावरील ढोले कॉम्पलेक्समधील ढोले हॉस्पीटलमध्ये न्युरोपॅथी व बीएमडी (हाडांचा ठिसुळपणा) तपासणी शिबीराचे आयोजन आज शनिवारी सकाळी ९ ते दुपारी १ वाजतापर्यंत करण्यात आले आहे.
डायबिटीज (मधुमेह), पायामध्ये जळजळ, जखम भरायला वेळ लागणे, पायामध्ये गोळे येणे, हातापायामध्ये मुंग्या येणे ही न्युरोपॅथीची लक्षणे आहेत. त्याचप्रमाणे स्त्रियांचे वय ३० वर्षापेक्षा अधिक, पाठीचा त्रास व वाताचे रूग्ण, दिर्घ काळापासुन औषध (स्टेराईड) घेणारे रूग्ण, थायरॉईडचे रूग्ण, धुम्रपान व मद्यपान करणारे, जास्त वेळ सावलीत राहणारे आदींना बीएमडी ची तपासणी करायची गरज पडते. या शिबीरमध्ये रूग्णांची तपासणी तज्ञ चिकीत्सक डॉ. क्रांतीसागर ढोले करणार असुन शिबीराचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.