बालविकास कार्यालय येथे सेवानिवृत्त पर्यवेक्षिका सौ.रजनी नागोसे यांचा निरोप व सत्कार समारंभ संपन्न

0
830
Google search engine
Google search engine

कर्तव्यदक्ष कर्मचाऱ्यांची कमतरता भासणार :- श्री विनोद हाटकर बाल विकास अधिकारी मुलचेरा

मुलचेरा : – तालुका मुख्यालयातील बाल विकास कार्यालय येथे सेवानिवृत्त पर्यवेक्षिका सौ रजनी रमेशराव नागोसे यांचा आज निरोप व सत्कार समारंभाचे कार्यक्रम घेण्यात आले,यावेळी अध्यक्ष म्हणून मार्गदर्शन करताना बाल विकास अधिकारी श्री विनोद हाटकर यांनी 30 वर्ष अतिदुर्गम भागात सेवा प्रदान करणाऱ्या पर्यवेक्षिका बद्दल बोलताना सौ.नागोसे ह्या एक कर्तव्यदक्ष कर्मचारी म्हणून मुलचेरा मध्ये प्रसिद्ध असून त्यांची सेवा समाप्त झाल्याने एक कर्तव्यदक्ष म्हणून कार्यालयाला कमतरता भासणार असल्याचे बोलले.
यावेळी सत्कारमूर्ती म्हणून सौ.रजनी नागोसे आणि रमेशराव नागोसे हे दाम्पत्य उपस्थित होते प्रमुख पाहुणे म्हणून तालुका पत्रकार संघटनेचे अध्यक्ष श्री महेश गुंडेटीवार,उपाध्यक्ष श्री गणेश बंकावार, सदस्य गणेश गारघाटे, विस्तार अधिकारी हेमंत खोब्रागडे, सुंदरनगर चे पर्यवेक्षिका सौ.बांबोळे, लगाम व अडपल्ली चे पर्यवेक्षिका सौ.रॉय आणि सर्व आंगणवडी सेविका,मदतनीस तसेच बाल विकास कार्यालयातील सर्व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रमुख पाहुणे म्हणून मार्गदर्शन करताना तालुका पत्रकार संघटनेचे अध्यक्ष महेश गुंडेटीवार यांनी सौ.रजनी रमेशराव नागोसे यांनी 1987 मध्ये पर्यवेक्षिका म्हणून रुजू झाल्यावर मुलचेरा,चामोर्शी, अहेरी तालुक्यातील कमलापूर सारख्या नक्षलग्रस्त भागात त्यावेळी बससेवा नसताना सुद्धा रेपणपल्ली येथून पायी प्रवास करून दुर्गम भागातील आंगवाडीला भेटी देऊन त्यांनी बालविकास कार्यालयाला बहाल केलेली सेवा ही बाल विकास कार्यालयाला कधीही विसरणारी बाब नसून प्रत्येक वेळी त्यांची नक्कीच कमतरता भासणार आणि त्यांची प्रकृती हलाखीची असताना सुद्धा सेवेत माघारी न घेता त्यांचा खडतर प्रवास हा तालुक्यातील प्रत्येक शासकीय कर्मचाऱ्याला नवीन स्फूर्ती देणारी बाब असल्याचेही त्यांनी बोलून दाखविली आणि त्यांना नवीन जीवन आणि नवीन वर्ष भरभराटीचे जावो अशी शुभेच्छा दिली. यावेळी प्रत्येकानी मार्गदर्शन करताना त्यांच्या कार्याबद्दल प्रशंशा केली आणि यावेळी प्रत्येकाचे डोळे पाणावले.
कार्यक्रमाच्या शेवटी या दाम्पत्याना कार्यालयातील सर्व कर्मचाऱ्यांकडून भेट वस्तू दिले आणि शॉल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आले.यावेळी सौ.रजनी नागोसे यांचे जीवनसाथी तथा मुलचेरा चे माजी पंचायत समिती सभापती यांनी तालुक्यातील कुपोषित बालकांना मोफत औषधी पुरविण्याचे संकल्प केली आणि वेळोवेळी आवश्यक तिथे मदत करण्याचे आश्वासन दिले.कार्यक्रमाचे संचालन विस्तार अधिकारी श्री हेमंत खोब्रागडे आणि आभार संवरक्षण अधिकारी महेंद्र मोतकुरवार यांनी केले.