तुळजापूर येथील तहसीलदार तथा मंदिराचे व्यवस्थापक सुनील पवार यांच्याविरुद्ध गुन्हा नोंद

0
852
Google search engine
Google search engine

श्री तुळजाभवानी मंदिरामध्ये पुरातत्व विभागाच्या अनुमतीविना पालट केल्याचे प्रकरण

मंदिर सरकारीकरणाचे दुष्परिणाम !

 

तुळजापूर – येथील श्री भवानीदेवीच्या मंदिरातील शेजघरातील उत्तर दिशेकडील मंदिराची मूळ प्राचीन भिंत पाडून त्या ठिकाणाहून भाविकांना बाहेर पडण्यासाठी नव्याने प्रवेशद्वार बनवल्याच्या,

 

 

तसेच प्राचीन उंबरा काढून पुरातन मंदिराची हानी केल्याच्या प्रकरणी संभाजीनगर येथील पुरातत्व विभागाचे अधिकारी नागनाथ गवळी यांच्या तक्रारीवरून ३ फेब्रुवारी या दिवशी तहसीलदार आणि मंदिराचे व्यवस्थापक सुनील पवार यांच्या विरोधात भारतीय दंड विधान संहिता कलम ३३(१) (२) (३) (४) अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला.

 

श्री तुळजाभवानी मंदिर लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असून महाराष्ट्र शासनाचे संरक्षित स्मारक आहे, हे सुनील पवार यांना ज्ञात असूनही त्यांनी हा पालट करून मनमानी कारभार केला आहे, असा आरोप होत आहे.