प्रतीकुल परिस्थितीत शिक्षण घेत आदर्श ठरलेल्या नवरत्नांचा गौरव

0
884
Google search engine
Google search engine

आकोट/संतोष विणके:-

प्रतीकुल गरीब परीस्थीतीत ही शिक्षण घेऊन समाजात आदर्श ठरलेल्या नवरत्नांचा शहरातील रजिया बानो मेमोरिअल ट्रस्टच्या वतीने गौरवपुर्ण सत्कार करण्यात आला.मदीना फंक्शन हॉल येथे पार पडलेल्या या सत्कार सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी ख्वाजा साकीबोद्दीन होते.तर प्रमुख मार्गदर्षक शहर ठाणेदार गजानन शेळके ,सज्जाद हुसेन,विशाल राजे बोरे,गोपाल नारे,आदी मान्यवर उपस्थित होते.या सत्कार समारंभात मुस्लीम समाजातील प्रतिकुल परीस्थीतीत उच्च शिक्षण घेत समाजासमोर आदर्श ठेवणाऱ्यांचा पुरस्कार देत सत्कार करण्यात आला.या सत्कारात पुरस्कारर्थींना सन्मानचिन्ह ,शाल,पुष्पगुच्छ ,प्रमाणपञ देऊन गौरवण्यात आले.अ.आसिफ ,मोहंम्मद साबीर,रहमत खान,अ.रशीद यांनी मजुरी करुन आपल्या मुलांना इंजिनियर बनवले.तसेच सज्जाद हुसेन ,डॉ.वसिम देशमुख,वसिम चौधरी,डॉ.परवेज खान,रिजवान खान,अश्या या नवरत्नांचा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.यावेळी कार्यक्रमाला उपस्थित मान्यवरांनी या उपक्रमाचे कौतुक करत असे उपक्रम समाजाला आदर्श व मार्गदर्षक ठरतील असे गौरवोद्गार काढले.कार्यक्रमाचे प्रास्तावीक संस्था सचिव पञकार वसीम अहमद खान,यांनी केले तर संचालन मनोज शर्मा,आभार निदा समन ,उजलेका शर्मिन,यांनी मानले,कार्यक्रमाला पञकार जफर खान ,अ.रफीक टेलर,अ.खलीद,मो.आसीम, वसी पेंटर,सै.ईरफान ,काशीफ खान,यांच्यासह बहुसंख्य विद्यार्थ्यांची उपस्थिती होती.कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली.