अल्पवयीन मुलीसोबत छेड खाणी करणाऱ्या शिक्षक पोलिसांच्या जाळ्यात

जाहिरात

👉🏻आसेगाव पोलीस स्टेशन हद्दीमधील घटना मुलीच्या आईची पोलीस स्टेशन मध्ये तक्रार

👉🏻आरोपी याला तात्काळ अटक आरोपी ला 12 एप्रिल पर्यंत न्यायालयीन कोठडी

चांदुर बाजार:-

अल्पवयीन मुलीसोबत सोबत अशील चाळे करणाऱ्या एका मुख्याध्यापक यास मुलीच्या आईच्या तक्रारी वरून ताब्यात घेतले आहे.त्याच्या या कृत्या मुळे शिक्षक याच्या व्यवसाय यास कलंक लागले आहे.

तालुक्यातील सावळापूर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक संजय भीमराव वाळूणकर वय 52 वर्ष रा परतवाडा या आपल्या शाळेतील एका बारा वर्षीय मुलीशी असील चाळे मागील एक वर्षा पासून करीत होता. मात्र दिनांक 5 मार्च ला सोमवार ला 2 वाजता च्या मधल्या सुटी मध्ये पीडित मुलीला आणि त्याच्या मैत्रीण ला खोली मध्ये बोलवले आणि त्यां खोलीचा दरवाजा आतून बंद करून स्वतः मोबाइल मधील अशील व्हिडीओ दाखवणे, तसेच त्यांचे फोटो काढणे,नको त्या ठिकाणी त्या स्पर्श करणे,हात पकडणे या सारखे प्रकार मागील एक वर्षा पासून आरोपी शिक्षक करीत होता.
मात्र पीडित मुलीने हा सर्व प्रकार आपल्या आईला सांगितल्यावर आई ने त्या शाळेतील एक महिला शिक्षक यास प्रकरणाची माहिती दिली.आणि आसेगाव पोलीस स्टेशन येथे काल जबानी रिपोर्ट दिला.त्याच्या तक्रार वरून आसेगाव पोलिसांची गुन्ह्याची नोंद करून घेतले आणि आरोपी याला तात्काळ एका तासाच्या आत अटक केली.या मध्ये आरोपी वर भादवी 354 अ आनि पास्को ऍक्ट नुसार 12,गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.सदर कार्यवाही ठाणेदार अजय आकरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस उपनिरीक्षक जीवन उताणे,गाडी ड्रायवर सहायक पोलिस उपनिरीक्षक पंजाब कडू, नाईक पोलिस कॉस्टबल नंदकिशोर बाकल, पोलीस स्टेशन खुफिया स्वप्नील तवर,अजमल सैय्यद यांनी केली.आरोपी यास काल न्यायालयात हजर केले असता त्यांना 12 एप्रिल पर्यंत न्यायालय कोठडी सुनावण्यात आली आहे.

 

*————————————-पीडित मुलीच्या आईच्या तक्रारी वरून पोलीस स्टेशन आसेगाव येथे गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.आरोपी याला आम्ही तात्काळ अटक करण्यात यश आले असून पुढील तपास मी स्वतः करीत आहे.

ठाणेदार अजय आकरे आसेगाव पोलीस स्टेशन

.

जाहिरात

Vidarbha24News युट्युब चॅनेल ला सबक्राईब करा

नोटिस: समाचार / में उद्धृत स्रोत लिंक केवल समाचार / आलेख प्रकाशित होने की तारीख पर मान्य हो सकते हैं। उनमें से अधिकतर एक दिन से कुछ महीने बाद अमान्य हो सकते हैं। जब कोई न्यूज लिंक  काम करने में विफल रहता है, तो आप स्रोत वेबसाइट के शीर्ष स्तर पर जा सकते हैं और समाचार / आलेख की खोज कर सकते हैं।