अ‍ॅट्रॉसिटीच्या प्रकरणात श्री मिलिंदभाऊ एकबोटे यांना जामीन मंजूर

0
869
Google search engine
Google search engine

पुणे : विशेष प्रतिनिधी :-

सभा बोलवणे, सभांमध्ये सहभागी होणे, भाषण न करणे या अटींवर समस्त हिंदू आघाडीचे कार्याध्यक्ष श्री मिलिंद एकबोटे यांना न्यायालयाने अ‍ॅट्रॉसिटीच्या गुन्ह्यात जामीन मंजूर केला आहे. विशेष न्यायाधिश प्रल्हाद भगूरे यांच्या न्यायालयाने श्री एकबोटेंना हा जामीन मंजूर केला.

साक्षीदारावर दबाव न आणणे, पत्रकार परिषद न घेणे, दर सोमवारी 3 ते 6 या वेळेत शिक्रापूर पोलिस ठाण्यात हजेरी लावणे. पासपोर्ट पोलिसांकडे जमा करणे, पोलिसांना तपासात सहकार्य करणे, न्यायालयाच्या परवानगीशिवाय भारत सोडून न जाणे अशा विविध अटी व शर्तींवर न्यायालयाने त्‍यांना जामीन मंजूर केला आहे. परंतु, अटी व शर्तींचा भंग झाल्यास तात्काळ अटक होईल असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.