पत्रकार संरक्षणासाठी पत्रकारांचे मुंबईला धरणे आंदोलन. – पत्रकार संरक्षण समितीने पाठवले राष्ट्रपति, राज्यपाल व मुख्यमंत्र्यांना निवेदन.

0
1254
Google search engine
Google search engine

मुंबई :-

पत्रकार संरक्षणाचा कायदा पारित व्हावा,दोन्ही सभागृहात मंजूर कायदा राज्यपालांच्या सही नंतर राष्ट्रपतींकडे सही अभावी रखडला असल्याने हा कायदा पत्रकार व पत्रकारितेच्या अस्तित्वासाठी नितांत गरजेचा आहे.या मागणीसाठी राज्याच्या अनेक जिल्ह्यातील पत्रकारांनी मुंबईच्या आझाद मैदानावर (दि.७ एप्रिल २०१८) रोजी धरणे आंदोलन केले.या आंदोलनात पत्रकारांच्या मूलभूत अडचणींवर चर्चा झाली व सरकारी अनास्थेचा निषेधही उपस्थित पत्रकारांनी व्यक्त केला.
पत्रकारांच्या संरक्षणाचा मसुदा महाराष्ट्राच्या दोन्ही विधिमंडळाकडून राज्यपालांची सही होऊन राष्ट्रपतींच्या सही अभावी अजूनही पूर्णत्वास आलेला नाही.राज्यातील पत्रकारांच्या हत्या,पत्रकारांच्या कुटुंबियांच्या हत्या,मारहानी,दमदाटयांच्या वाढत्या घटना,सुडाने अपघात घडविण्याचे प्रकार हे लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाच्या दृष्टीने धोकेदायक आहे.याचा बळी कार्यक्षेत्रावर बातमी मिळवणारे पत्रकार छायाचित्रकार होत आहे या कायद्याची तातडीने अंमलबजावणी करावी तसेच प्रत्येक जिल्ह्यातील माहिती कार्यालयात,कामगार उपायुक्त विभागात पत्रकारांची नोंदणी करावी,ग्रामीण व शहरी कष्टकरी पत्रकारांना जाचक निकष कमी करून अधिस्वीकृती द्यावी.टोलमाफी मिळावी,आरोग्याच्या पर्याप्त सुविधेबरोबर पत्रकारांना उतारवयात पत्रकारांना पेन्शन मिळावी या मागणीचे पत्र राज्याचे राज्यपाल बी .विद्यासागर राव मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांना पाठवण्यात आले.यावेळी पत्रकारांच्या मागण्यांचे निवेदन स्वीकारून चर्चा करणेसाठी ही राज्यसरकार वेळ देत नसल्याने उपस्थित पत्रकारानी तीव्र संताप व्यक्त केला,यावेळी सरकार केवळ एकाच संघटनेचा उदोउदो करतंय,मात्र पत्रकारांच्या कृतिशील कार्य करणारर्या संघटना व समित्यांशी दुजाभाव करीत असल्याचे मत पत्रकारांनी मांडले.शेवटी राज्यभरातून आलेल्या पत्रकारांनी आता अत्यंत निष्ठतेने आपले मुद्दे सरकार दरबारी मांडावे त्यांना याबाबत कार्यवाहीसाठी संघटनांनी कसोटी ने प्रयत्न करावे,असे ठरवून आंदोलनाची सांगता पत्रकार संरक्षण समितीचे प्रमुख विनोद पत्रे यांनी केली.या पत्रकार धरणे आंदोलनात संघटनेचे प्रमुख विनोद पत्रे, महाराष्ट्र प्रदेश सचिव श्री अनिल चौधरी , महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष रामजी खुर्दळ , पुणे जिल्हाध्यक्ष नाथाभाऊ उंदरे,उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष दिलीप सोनार ,महाराष्ट्र साप्ताहिक वृत्तपत्र असोसिएशनचे राज्यअध्यक्ष नंदकिशोर धोत्रे ,नाशिक जिल्हाध्यक्ष प्रमोद रहाणे,यासह मुंबई,पुणे,नाशिक,बुलढाणा,वर्धा,यवतमाळ,अमरावती,नागपूर,औरंगाबाद, पालघर व कल्याण यासह राज्यभरातून सुमारे २०० ते २५० पत्रकारांची उपस्थित होते.
या आंदोलनात नाशिकहून तालुकाध्यक्ष महेश गायकवाड,नाशिक विचार चे दत्तात्रय शिरोडे,समीर वेलदे,सुभाष कांडेकर,राजेंद्र उबाळे,राजू भांड,नाशिक जनमत चे चंद्रकांत धात्रक,यावेळी उपस्थित होते.