प्लास्टिक बंदीसंदर्भातील अधिसूचनेवर स्थगिती देण्यास हायकोर्टाचा नकार. भविष्याच्या दृष्टीने पर्यावरणाचे संवर्धन महत्त्वाचे – कोर्ट

0
709
Google search engine
Google search engine

मुंबई : प्लास्टिकबंदीच्या निर्णयावर स्थगिती देण्यास मुंबई हायकोर्टाने नकार दिला आहे. मात्र राज्य सरकारनं ठरवून दिलेल्या तारखेपर्यंत प्लास्टिकबंदी कायद्यानुसार कुणावरही कठोर कारवाई करु नये, असं कोर्टाने स्पष्ट केलं आहे.

नागरिकांनी त्यांच्याजवळ असलेल्या प्रतिबंधित प्लास्टिक बॉटल्स रिसायकलिंगसाठी स्थानिक प्रशासनाकडे जमा कराव्यात, अशा सूचनाही मुंबई हायकोर्टाने दिल्या.

प्लास्टिकच्या वाढत्या वापरामुळे पर्यावरणाचं मोठं नुकसान होत आहे. भविष्याचा विचार करता पर्यावरणाचं संवर्धन करणं महत्त्वाचं असल्याचं मत निकाल देताना मुंबई हायकोर्टाने व्यक्त केलं.