आकोट आगारातुन आज पासुन परत खान्देशसाठी बससेवा

0
771
Google search engine
Google search engine

आकोटः संतोष विणके –

प्रवाश्यांच्या मागणी वरुन आकोट आगारातुन आजपासुन परत जळगाव खांदेशसाठी बससेवा सुरु करण्यात येत आहे.आकोटवरुन थेट जळगाव ला जाणारी ही बस दररोज सकाळी ११ः ४५ला सुटणार असुन ती जळगावला दु ५ वा.१५ वा.पोहचणार आहे .तर जळगाव हुन अकोटसाठी सकाळी ५ः३० वा बस असणार आहे ती सकाळी ११ वा.अकोटला पोहचणार .गेल्या काही दिवसांपासुन ही बस प्रवाश्यांना उपलब्ध नव्हती .ही बस जळगाव सह भुसावळ, मुक्ताईनगर,मलकापुर,नांदुरा,खामगाव,शेगाव ला जाणाऱ्या प्रवाश्यांसाठी सोईची आहे.ती परत सुरु करावी अशी बऱ्यांच दिवसांपासुनची प्रवाश्यांची व व्यापारी वर्गाची मागणी होती.प्रवाश्यांच्या मागणीचा विचार करत विभाग नियंञक सौ.चेतना खिरवाडकर व आकोट आगार प्रमुख दिपक जोशी यांच्या आदेशाने ही बस परत प्रवाश्यांच्या सेवेत आज दि.१४ मे पासुन सुरु करण्यात येत आहे.