बेळगाव विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात ‘पाकिस्तान जिंदाबाद’च्या घोषणा देणर्‍यांवर देशद्रोहाचा गुन्हा नोंदवा ! – हिंदू एकता आंदोलन

0
854
Google search engine
Google search engine

 

 

कोल्हापूर – कर्नाटक विधानसभा निवडणुकीत बेळगाव उत्तर विभाग येथे दोन वेळा निवडून आलेले काँग्रेसचे उमेदवार फिरोज सेठ यांच्या प्रचारात ‘पाकिस्तान जिंदाबाद’ अशा घोषणा देण्यात आल्या. या घटनेचे पडसाद सामाजिक संकेतस्थळावर, तसेच प्रसिद्धीमाध्यमांद्वारे देशभर उमटले आहेत. याला शिक्षेची तरतूद असून अशा घटना धोकादायक ठरू शकतात. असे नेते देशाचे नागरिक असू शकत नाही. अशा गोष्टी या देशाच्या संविधानाच्या विरोधात असलेले ‘स्लो पॉयझन’च आहे. त्यामुळे अशांना शिक्षा होणे आवश्यक आहे. तरी बेळगाव विधानसभा निवडणुकीत ‘पाकिस्तान जिंदाबाद’च्या घोषणा देणारे नेते आणि कार्यकर्ते यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा (भा.द.वि. १२४ ए) नोंदवावा, अशी मागणी हिंदू एकता आंदोलनाने निवेदनाद्वारे पोलिसांकडे केली आहे. या वेळी जिल्हाध्यक्ष श्री. चंद्रकांत बराले, सर्वश्री गणेश नारायणकर, हिंदुराव शेळके, शिवसेनेचे श्री. किशोर घाटगे, तसेच अन्य उपस्थित होते.