सामाजिक विकासाला वाहुन घेतलेले लोकनेते स्व.आमदार संपतराव देशमुख।

0
2083
Google search engine
Google search engine

सांगली/कडेगांव/हेमंत व्यास:-

सामाजिकविकासाला वाहुन घेतलेले लोकनेते स्व.संपतराव देशमुख.

राजकारण,सहकार,शिक्षण,शेती कायदा अशी विविध दालने श्रीमंत करणारे ते स्वाभिमानी लोकनेते स्व.वसंतदादा पाटील यांच्या विचारांचे अनुकरण करणारे रांगडे,जिद्दी शिलेदार होते.स्व.आण्णांचा जन्म सांगली जिल्ह्यातील कडेपुर ता.कडेगांव येथे ४ एप्रिल १९३९ रोजी एका संस्कार संपन्न शेतकरी कुटूंबात झाला.त्यांचे प्राथमिक शिक्षण पाटणला बाबासाहेब पाटणकर यांच्याकडे तर शालेय व महाविद्यालयीन शिक्षण कराड येथिल शिवाजी विद्यालय व सदगुरु गाडगे महाराज महाविद्यालयातुन झाले. बी ए नंतर मुंबई च्या गव्हर्नमेंट लॉ विद्यालयातुन त्यांनी एल एल बी ची पदवी संपादन केली.इथपर्यंत त्यांचे जीवन सामान्य माणसाप्रमाणे गेले

.ते एक सामान्य वकील व्हावेत असे नियतीच्या मनात नव्हते.१९६७ते १९७७पर्यंत जिल्ह्यात फौजदारी वकील म्हणुन वचक निर्माण करणार्या आण्णांना राजकारणात पडण्याची बुध्दी का व्हावी म्हणुनच वकील किंवा जिल्हाधिकारी या उपाधीपेक्षा डोंगराई उद्योग व टेंभु योजनेचे शिल्पकार या उपाधीचीच नियतीला भुरल् पडली असावी.अन्यथा एका शेतकर्याचा मुलगा आमदार किंवा लोकनेता कसा झाला असता.१९८४ ते १९८७ या कालात ते सांगली जिल्हा परिषदेच्या अर्थ व शिक्षण खात्याचे सभापती होते.खर्या अर्थाने राजकारणात त्यांनी मागे वलुन पाहीलेच नाही.१९८८साली डोंगराई सुतगिरणीचे भव्य स्वप्न दिमाखात उभे केले.परिसरातील अनेक रिकाम्या हातांना कामे मिलाली मे १९९४साली सुत परदेशात निर्यात होऊ लागली.दरम्यान युवक नेते पृथ्वीराज देशमुख याला मार्गदर्शन करुन राजकारण व सहकाराचे धडे दिले.डोंगराई साखर कारखाना,डोंगराई पेट्रोल पंप डोंगराई सुत गिरणी आदी संस्था आजही दिमाखात ऊभ्या आहेत. १९९५साली आमदार झाल्यानंतर क्षणाचीही विश्रांती घेतली नाही.शेतीला पाणी पाहीजे व पाण्याला टेंभु पाहीजे असा त्यांनी ध्यास घेतला.शेतकरी समृध्द व्हावा व कामगार सुखी रहावा म्हणुन त्यांनी आयुष्य पणाला लावले.गावावर,कार्यकर्त्यावर,शेतीवर त्यांचे विलक्षण प्रेम होते.रात्री बाराला कार्यकर्त्याच्या हाकेला ओ देणारा हा नेता होता.स्व वसंतदादा पाटील ,बापुंप्रमाणे कार्यकर्त्याला नेता बनविण्याची किमया त्यांच्यात होती.आण्णा रांगडे व करडे होणारे होते पण मगरुर नव्हते.अन्याया विरुध्द पेटुन उठत पण ते सुडबुध्दीचे नव्हते.त्यांनी ज्याला आपले मानले त्यांना कधीच उघडे पाडले नाही.ते संघटक होते.त्यांचे कार्य प्रत्येक पिढीला मार्गदर्शक व्हावे म्हणुन संपतराव देशमुख ज्ञानप्रबोधिनी व विचारमंच स्थापन करणे आणि घराघरात पोहचवणे हीच त्यांना खरी श्रध्दांजली ठरेल.त्यांच्या विचारांचे वारसदार त्यांचे चिरंजीव जिल्हा परिषदेचे विद्यमान अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख व पुतणे सांगली जिल्हा भाजपचे अध्यक्ष माजी आमदार पृथ्वीराज देशमुख हे दोघे बंधु सर्वांना बरोबर घेऊन सध्या आण्णांच्या स्वप्नपुर्तीसाठी जीवाचे रान करीत आहेत.या कडेगांव पलुस मतदार संघातील लोक आण्णांना कधीच विसरु शकणार नाहीत.ते कायमस्वरुपी अमर आहेत,अजिंक्य आहेत.
चौकट
सहकाराच्या माध्यमातुन बहुजन समाजाच्या सर्वांगीण उन्नतीचे पर्व स्व. यशवंतराव चव्हाण,वसंतदादा पाटील,राजारामबापु पाटील व बालासाहेब देसाई या चार लोकनेत्यांनी त्यांच्या कार्यकर्त्याना नेते केले.जे राज्याच्या मंत्री मंडलात आजही विद्यमान आहेत.या लोकनेत्यांच्या नावाच्या यादीत आणखी एक नाव आवर्जुन लिहाव लागते ते म्हणजे स्व.आमदार संपतराव देशमुख यांचे. समाजविकासाला वाहुन घेतलेले लोकनेते स्व.आमदार संपतराव देशमुख यांच्या स्मृतीदिनानिमित्त