*कडेगांव मधील ग्रामस्थांचा व शेतकऱ्यांचा टेंभुच्या पाण्यासाठी टाहो उपोषण सुरू*

0
1088
Google search engine
Google search engine

सांगली / कडेगाव : हेमंत व्यास –

कडेगाव शहरास शुध्द पाणी पुरवठा व्हावा
कडेगाव तलाव टेंभू सिंचन योजनेच्या लाभ क्षेत्रात समावेश करावा.अशा विविध मागण्यांसाठी कडेगाव येथील ग्रामस्थ डी. एस.देशमुख ,राजाराम संपत माळी आणि शांताराम दीक्षित हे आज पासून आमरण उपोषणास बसले .

उपोषणाच्या पहिल्या दिवशी आमदार मोहनराव कदम ,भाजपाचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख यांनी भेट देऊन याबाबत पाठपुरावा करणार असल्याचे सांगितले.तर टेंभू चे सहाय्यक अभियंता ऐन.आर घार्गे यांनी याबाबत वरिष्ठांना अहवाल दिला असल्याचे सांगितले.

आज बुधवार (दि.२३)रोजी सकाळी १० वा.ग्रामस्थांच्या वतीने तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.
यावेळीकडेगाव तलावात पाणी सोडण्याची ग्रामस्थांकडून वारंवार मागणी होत आहे

कडेगाव तलाव लाभ क्षेत्रात घ्यावा आणि या तलावात कायमस्वरूपी पाणी सोडावे.टेंभू सिंचन योजनेच्या पाण्याची सहा आवर्तन असून देखील वेळेवर सोडली जात नाही.वसूल केलेली टेंभू योजनेची पाणीपट्टीची पावती पाटबंधारे खात्याकडून शेतकऱ्यांना देण्यात यावी. सध्या शहरात अनियमित शेवाळयुक्त व गढूळ पाणीपुरवठा होत आहे.त्यामुळे लहान मुले व वृद्ध यांच्या आजारपणात वाढ होत आहे.त्यामुळे शहराला शुद्ध पाणीपुरवठा व्हावा .अशा विविध मागण्या जोपर्यंत मान्य होत नाहीत तोपर्यंत आमरण उपोषण सुरू राहणार असल्याचे उपोषणकर्ते डी. एस.देशमुख ,राजाराम संपत माळी, आणि शांताराम दीक्षित यांनी सांगितले.

यावेळी कडेगावातील ,धनंजय देशमुख ,राजाराम डांगे ,संतोष डांगे,प्रकाश शिंदे , महेश देशमुखे ,ज्ञानेश्वर शिंदे रघुनाथ गायकवाड अनिल देसाई प्रकाश शिंदे शशिकांत रास्कर वसंत ईनामदार राजेंद्र शिंदे बबन आण्णा देशमुख श्रीरंग माली अरूण आबा देशमुख राजेंद्र पाटोले दिलीप पाटील यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.