*पत्रकार वरील दाखल केलेले गुन्हे त्वरित माघे घेण्याची पत्रकार सुरक्षा समितीची पोलीस आयुक्त यांच्याकडे मागणी*

0
791
Google search engine
Google search engine

सोलापूर सोलापुरातील दैनिक पुढारी चे कार्यकारी संपादक व पत्रकार अमोल व्यवहारे यांनी पोलीस खात्यामधील गुन्हे शाखेचे बाबतीत बातमी लावली होती त्या बाबतीचा राग मनात ठेवून पोलिसांनी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदर दाखल करण्यात आलेला गुन्हा ताबडतोब पाठीमागे घेण्यात यावी मागणी पत्रकार सुरक्षा समिती वतीने पोलीस आयुक्त यांना निवेदनाद्वारे करण्यात आली
या प्रसंगी जिल्हा प्रभारी अध्यक्ष म्हणाले की सोलापूर शहरात दारू मटका जुगार विषारी शिंदी बेकायदेशीर वाळू उपसा या सारखे बेकायदेशीर धंदे बंद करण्यात यावेत प्रामाणिक पत्रकार वर बातमी लावली म्हणून गुन्हे दाखल करण्यात येत असतील तर पत्रकार सुरक्षा समिती वतीनं मोठ्याप्रमाणात आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा दिला.

यावेळी पत्रकार सुरक्षा समितीचे प्रदेश अध्यक्ष यशवंत पवार जिल्हा संघटक मोहसीन कोतकुंडे सहसचिव खिजर पगडीवाले शहर संघटक विकास आमटेकर संपर्क प्रमुख शफी चितापुरे शहर सहसचिव दामोदर पासकटी उप संघटक मल्लिनाथ साखरेमोल यासीन शेख दत्ता फाळके विष्णू सुरवसे दादासाहेब जाधव अजय खांडेकर सूर्यकिरण भोसले प्रशांत चव्हाण प्रभाकर एडके नितीन कांबळे सुभाष म्हेत्रे संजय जाबा इत्यादी पत्रकार उपस्थित होते.