अवैध जनावर वाहतूक करणाऱ्या वर कार्यवाही

0
653
Google search engine
Google search engine

अवैध जनावर वाहतूक करणाऱ्या वर आयपीएस समीर शेख यांची कार्यवाही,22 गौवंश यांची जिवंत सुटका.

सहा आरोपी याना अटक तर तीन आरोपी फरार,तपास मध्ये आणखी वाढू शकते आरोपी ची संख्या:-पोलीस सूत्र

कृषी उत्पन्न बाजार समिती मधील कर्मचारी यांना अटक ,महर्षी गौरक्षण संस्था कडे पाठविली जनावरे,2 गौवंश यांचा मृत्यू

चांदुर बाजार:-

दिनांक 10 जून रविवार गुप्त माहिती च्या आधारे चांदुर बाजार येथील ठाणेदार म्हणून कार्यरत असलेले आयपीएस अधिकारी समीर शेख यांनी अवैध जनावर यांची कत्तल करण्याच्या उद्देशाने होणारी वाहतूक हाणून पाडली आहे.त्यामुळे अवैध जनावर वाहतूक करणारे यांच्या आनि बाजार समिती मधील अधिकारी यांचा वर झालेल्या कार्यवाहिमुळे अनेकांचे डोळे उघडले आहे.तर कृषी उत्पन्न बाजार समिती मधील अधिकारी या अवैध जनावर वाहतूक ला पाठींबा देत असल्याचे समोर आले आहे.

‌रविवार हा तालुक्याचा आठवडी बाजार असल्याने कृषी उत्पन्न बाजार समिती येथे जनावरांचा देखील बाजार भरतो.मात्र सायंकाळी 5 ते 6च्या दरम्यान आयपीएस समीर शेख याना गुप्त माहिती मिडाळी की बाजार समिती मधून कत्तल करीत जनावराची अमानुषपणे वाहतूक होत आहे. तात्काळ त्यांनी बाजार समिती गाठली.ठाणेदार आल्याची माहिती लागताच गाडी ड्रायव्हर समीर अहमद नीरज अहमद वय 23 वर्ष रा. शी.बंड अहमद हा पसार झाला.तर यांच्या बरोबर दुसऱ्या गाडीचे गाडी मालक आणि ड्रायव्हर फरार आहे. तर कृषी उत्पन्न बाजार समीर मधील कर्मचारी गजानन सुभाषराव धोटे वय 30,जमीर अहमद नीरज अहमद ,संदीप जगन्नाथ बंड चौकीदार, अजय गजानन म्हाला रा. करजगाव ,रोशन बाष्कर लगोटे रा.थुगाव ,सुरेंद्र महादेव भगत रा .माधान याना अटक केली. MH 27 X8496,आणि MH 29 ,T5623 या दोन महिंद्रा पीक उप गाड्या पोलिसांनी यावेळी जप्त केल्या.आणि त्यामधील एकूण 22 जनावराची सुखरूप सुटका करून त्यांना स्थानिक चांदुर बाजार येथील महर्षी गौरक्षण संस्था यांचे कडे सोपविण्यात आली.

बाजार समिती मधील कर्मचारी याना हा सगळा प्रकार माहिती असून या सर्व प्रकरनाला ते पाठबळ देत असल्याची माहिती पोलीस सूत्रांकडून मिडाळी आहे. तर सर्व आरोपी याना दिनांक 11जून 2018 ला न्यालायत हजर केले असता त्यांना दिनांक 13जून (तीन दिवसांची)पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
पोलिसांनी या कार्यव्याही मध्ये एकूण 22 जनावराचे प्राण वाचवले तर आज 2 गाईचा चा मरण पावल्या आहे.तसेच एकूण 7 लाख 30 हजारांचा माल पोलिसांनी जप्त केला आहे.सदर कार्यवाही आयपीएस समीर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक नंदू काळे, पोलीस कॉस्टबल अरविंद गावडे,चांदुर बाजार पोलीस स्टेशन खुपिया विरेंद्र अमृतकर,निकेश नशीबकर, भूषण पेठे नितीन डोगरे अर्जुन परिहार,यांनी केली.तसेच फरार आरोपीचा शोध चांदुर बाजार पोलीस घेत आहे.या मध्ये आरोपी प्राणी संरक्षण कायदा,भारतीय दंड साहिते नुसार अनेक गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.