आज आकोटात कडाडणार इंदोरीकर महाराजांच्या विचार कीर्तनाची तोफ

0
1466
Google search engine
Google search engine

आकोट/संतोष विणके – संपुर्ण महाराष्ट्रात ख्याती असलेले विचार किर्तनकार ह. भ.प.निवृत्ती महाराज इंदोरीकर यांच्या किर्तनाचा जागर आकोटला पार पडणार असुन. आज दि.१४ ला संध्या.६ वा. कास्तकार सभागृह,कृषी उत्पन्न बाजार समीती पोपटखेड रोड आकोट येथे हा कार्यक्रम संपन्न होत आहे.कै.दत्तुजी हांडे यांच्या ११व्या पुण्यस्मरणा निमित्य या प्रबोधनपर किर्तन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.इंदोरीकर महाराज हे ग्रामिण बोली भाषेतील किर्तन संवादासाठी ओळखले जातात.बोली भाषेतुन मर्म विनोदी वास्तव विवेचनासाठी ते प्रसिद्ध आहेत.अद्यात्म जगतात प्रबोधनपर किर्तनकार म्हणुनही ते लोकप्रिय आहेत.या कार्यक्रमाला मा.ना श्री. महादेव जानकर पशुसंवर्धन दुग्धविकास मत्सविकास मंञी महाराष्ट्र राज्य यांची विशेष उपस्थीती असणार आहे.अश्या या समाज प्रबोधनपर किर्तन कार इंदोरीकर महाराजांच्या किर्तनाचा लाभ घेण्याचं आवाहन आयोजन समीतीने केले आहे.कै .दत्तुजी हांडे हे राष्ट्रीय समाज पक्षाचे अकोला जिल्हाध्यक्ष सतीष हांडे यांचे वडील होते.त्यांच्या पुण्यस्मृती निमित्त या किर्तनाचे आयोजन करण्यात आले आहे.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आयोजन समीतीचे संजय आठवले,चंद्रशेखर बारब्दे,ब्रम्हकुमार पांडे यांच्यासह छावा संघटना,राष्ट्रीय समाज पक्ष ,रयत क्रांती संघटना तथा आयोजन समीती परीश्रम घेत आहे.