मूल होत नसल्याने पत्नीचा खुन करणाऱ्या पतीस अटक

513

अनिल चौधरी , पुणे

 मूल होत नसल्याने रेश्मा हनुमंत कुऱ्हाडे (वय 19) यांचा  खून करण्यारा पती हनुमंत कुऱ्हाडे रा. स्नेहांकित कॉलनी कर्वेनगर,पुणे यास वारजे पोलिसांनी अटक केली आहे.

   याबबत मयत रेश्मा कुऱ्हाडे यांचा भाऊ लक्ष्मण वठूर रा. लोहगाव, जिल्हा विजापूर  यांनी वारजे पोलीस स्टेशन फिर्याद दिली आहे. मयत रेश्मा यांना मूल होत नाही म्हणून पती, सासू- सासरे हे आप-आपसात संगनमत करून रेश्मा ह्याना सतत टोमणे, टोचून बोलत असत. तसेच माहेरवरून सोने आणण्यासाठी सारखा दबाव टाकत असत , तिचा शाररीक मानसिक छळ करत असत. घटनेच्या दिवशी रेश्माकडे कडे जमा असलेले घरभाड्याचे पैसे तिने दिले नाही म्हणून पती हनुमंत कुऱ्हाडे याने तिचा गळा दाबून खुन केला. याबाबत रेश्मा चा भाऊ लक्ष्मण वठूर यांनी वारजे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून पुढील अधिक तपास वारजे पोलीस करत आहेत.

 

जाहिरात

Vidarbha24News युट्युब चॅनेल ला सबक्राईब करा

नोटिस: समाचार / में उद्धृत स्रोत लिंक केवल समाचार / आलेख प्रकाशित होने की तारीख पर मान्य हो सकते हैं। उनमें से अधिकतर एक दिन से कुछ महीने बाद अमान्य हो सकते हैं। जब कोई न्यूज लिंक  काम करने में विफल रहता है, तो आप स्रोत वेबसाइट के शीर्ष स्तर पर जा सकते हैं और समाचार / आलेख की खोज कर सकते हैं।