कडेगावमध्ये कडकडीत बंद!

0
980
Google search engine
Google search engine

सांगली/कडेगांव/हेमंत व्यास:-

पंढरपूर गुहागर व विजापूर सातारा अशा दुहेरी महामार्गावर कडेगांव येथे आज मराठा क्रांती मोर्चा आरक्षण आंदोलनामुळे कडकडीत बंद असल्यामुळे पंढरपुरातुन येणारे काही वारकरी परतीचा प्रवास करीत आहेत आज सकाळपासूनच कराड ओगलेवाडी येथे कोणत्याही प्रकारची वहाने पुढे जावु देत नसल्याने पंढरपुर,वीजापुर,जय या भागातुन येणाऱ्या सर्व गाड्या कडेगांव एस टी स्थानकात थांबविण्यात आल्या होत्या.

कडेगांवमधील सर्व दुकाने,हाॅटेल, पानपट्टी,चहा टपरीधारक बंद असल्याने वारकऱ्यांची गैरसोय होत होती ही बाब कडेगांव पोलिस स्टेशनचे पोलिस हवालदार संतोष पाटील,काॅ.अशोक आंबेकर,किरण पाटील, बाबासाहेब खरमटे,लक्ष्मण मेंडके, वंजारे दादा महीला पोलिस काॅस्टेबल जाधव, पवार मॅडम हे बंदोबस्तासाठी स्टॅड परीसरात असल्याने त्याचे लक्षात आली.त्यांनी बंदोबस्तास असतानाच माणुसकीच्या नात्याने बसस्थानक परिसरात जेवढे वारकरी होते त्या सर्वांना केळी व फराळाचे साहीत्य व पिण्याचे पाणी स्वखर्चाने पदरमोड करुन मोफत वाटप केले.समाजाची जाण ठेवुन पोलिसांनी कर्तव्य बजावत असताना या केलेल्या कार्यास सलाम.एकंदरीत मराठा क्रांती मोर्चा आंदोलनामुळे कडेगावात कडकडीत बंद पाळण्यात आला.मराठा क्रांती मोर्चा आरक्षणाच्या मागण्या मान्य न केल्यास कडेगांव तालुक्यातील आंदोलन कार्यकर्ते तिव्र आंदोलन करतील असेही कार्यकर्ते बोलताना दिसत होते.यावेळी सुरेश देशमुख (दुबे नाना) विजय शिंदे,नगरसेवक सुनिल पवार,सागर सुर्यवंशी,अनिल तवर, शिवलिंग सोनवणे, यांच्यासह मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते उपस्थीत होते.कडेगांव पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक के.एस.पुजारी यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता त्यामुळे कडेगावात कोणताही अनुचित प्रकार घडला नाही.