स्व. लोकनेते गोपीनाथराव मुंडे टॅलेंट हंट परीक्षेत संस्कार शाळेचे यश

0
754
Google search engine
Google search engine

परळी (प्रतिनिधी)

शैक्षणिक वर्ष २०१७-१८ या वर्षात स्व.लोकनेते गोपीनाथराव मुंडे टॅलेंट हंट अकॅडेमी परळी वैजनाथ यांच्या वतीने टॅलेंट हंट या परीक्षेचे आयोजन मार्च २०१७ रोजी करण्यात आले होते. सदरील परीक्षा हि शालेय अभ्यासक्रम तथा सामान्य ज्ञान व बुद्धिमत्ता यावर आधारित होती. या परीक्षेचे स्वरूप वस्तूनिष्ठ प्रश्नावर आधारित होते. हि परीक्षा इयत्ता पाचवी ते बारावी या वर्गांसाठी आयोजित करण्यात आली होती. परळी शहर व तालुक्यातील जवळपास पाचवी ते सातवी या गटातील एकूण ४५५० सहभागी विद्यार्थ्यापैकी संस्कार शाळेतील इयत्ता सहावीतील कु. धनश्री यशवंत गुट्टे या विद्यार्थिनीने पाचवी ते सातवी या गटातून सर्वोत्कृष्ट गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकावला . कु.धनश्री यशवंत गुट्टे या विद्यार्थिनीला आज स्व.लोकनेते गोपीनाथ मुंडे टॅलेंट हंट अकॅडमीच्या वतीने तिने मिळवलेल्या प्रथम क्रमांकाबद्दल या अकॅडमीचे श्री. माधव मुंडे,श्री विनोद दराडे कु, नंदिनी मुंडे यांच्या हस्ते बक्षीस म्हणून सायकल देण्यात आली.या प्रसंगी शाळेच्या मुख्याध्यपिका श्रीमती गित्ते पी. आर. मॅडम यांनी व शाळेचे सचीव श्री दिपक तांदळे सर यांनी कु धनश्री गुट्टे हिचे अभिनंदन केले. शाळेच्या या यशाबद्दल शाळेचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.